Hardik Pandya: मुंबईनं हार्दिक पांड्याला रिटेन करु नये, भारताच्या माजी खेळाडूनं कॅप्टन पदासाठी नवी नावं सुचवली
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सनं विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी नवा प्रयोग केला मात्र तो अपयशी ठरला. मुंबई आज अखेरचा सामना खेळणार आहे.
![Hardik Pandya: मुंबईनं हार्दिक पांड्याला रिटेन करु नये, भारताच्या माजी खेळाडूनं कॅप्टन पदासाठी नवी नावं सुचवली Hardik Panyda should not be retained by Mumbai in the mega auction prefer Suryakumar Yadav and Jasprit Bumrah for captaincy advice by Manoj Tiwary Hardik Pandya: मुंबईनं हार्दिक पांड्याला रिटेन करु नये, भारताच्या माजी खेळाडूनं कॅप्टन पदासाठी नवी नावं सुचवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/e7fc31aa6274ee585c3310097e839b3c1715909815455989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2024) पाचवेळा विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम यंदाच्या हंगामातील अखेरची मॅच खेळणार आहे. आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) यांच्यात मॅच होणार आहे. मुंबईनं या हंगामात खेळलेल्या 13 मॅचमध्ये त्यांना 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईला केवळ चार मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. या निराशाजनक कामगिरीमुळं आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्सला सर्वात पहिल्यांदा बाहेर पडावं लागलं. मुंबईच्या या कामगिरीवर आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीनं (Manoj Tiwary) भाष्य केलं आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईच्या टीमने रिटेन करु नये, असं मनोज तिवारीनं क्रिकबझ सोबत बोलताना म्हटलं.
मनोज तिवारी काय म्हणाला?
मुंबईची आतापर्यंतची कामगिरी पाहिली असता ते टॉप फोरमध्ये जातील अशी अपेक्षा असते. मुंबईच्या टीममध्ये जे बदल झाले ते सकारात्मक नव्हते. नव्या कॅप्टनची काही वक्तव्य चाहत्यांमध्ये चांगल्या प्रकारे गेली नव्हती. रिश्ते मे तो हम तुम्हारे कप्तान लगते है, नाम है हार्दिक पांड्या, ते बोलण्याची वेळ योग्य नव्हती. चाहत्यांचा पाठिंबा मुंबईसाठी महत्त्वाचा असतो, तो त्यांना मिळाला नाही, असं मनोज तिवारी म्हणाला. कार्यक्रमात बोलताना मुंबईच्या टीममध्ये कॅप्टन म्हणून रिटेन करु नये, हे मत असल्याचं मनोज तिवारीनं म्हटलं.
हार्दिक पांड्या गुजरातच्या टीमला विजेतेपद मिळवून देऊन मुंबईत आला आहे. पण, कॅप्टन म्हणून त्याला मुंबईच्या चाहत्यांनी स्वीकारलं नाही. मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये पाहिलं असता जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे दोन पर्याय आहेत. यामध्ये सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर आहे, असं मनोज तिवारीनं म्हटलं.
मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन करेल,असं वाटत असल्याचं मनोज तिवारी म्हटलं. बुमराह आणि सूर्यकुमार यादवला रिटेन करावं, असा सल्ला मुंबईच्या मॅनेजमेंटला असेल, असं तिवारी म्हणाला. बुमराह आणि सूर्यकुमार यादव या दोघांमध्ये कुणालाही कॅप्टन करावं, असं मनोज तिवारी म्हणाला. रोहित शर्माला स्वत: ला वाटत असेल की मुंबईनं रिटेन करावं, असं मनोज तिवारी म्हणाला.
मुंबई विजयानं समारोप करणार?
आज मुंबई इंडियन्स होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध लढणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवत शेवट गोड करण्याचा प्रयत्न मुंबईचा असेल.
संबंधित बातम्या :
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)