(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Pandya: आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याचं मिशन वर्ल्डकप!
Hardik Pandya: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स पराभव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय.
Hardik Pandya: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स पराभव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलंय. या विजयानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी गुजरातच्या संघाचं कौतूक केलं आहे. आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. परंतु, आयपीएल 2022 ची ट्रॉफी जिंकून त्यानं क्रिडाविश्वावर आपली छाप सोडली. आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिकला भारताला विश्वचषक जिंकून द्यायचं आहे.
देशाचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट
राजस्थान विरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्यानं 30 चेंडूत 34 धावा केल्या. तसेच चार षटकात 17 धावा देऊन राजस्थानच्या चार महत्वाच्या फलंदाजाला माघारी धाडलं. ज्यामुळं त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे. दरम्यान, पत्रकार परिषेद बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, त्याला भारताला विश्वचषक जिंकून द्यायचा आहे. त्यासाठी काहीही करण्याची हार्दिकची तयारी आहे. भारतासाठी खेळणं माझं खूप मोठं स्वप्न होतं. आपण कितीही सामने खेळलो तरी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, खूप मोठ्या सन्मानाची गोष्ट असते.
हार्दिक पाचव्यांदा विजयी संघाचा ठरला भाग
हार्दिक पांड्या याआधी मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. मुंबईनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. यातील चार ट्रॉफी जिंकताना हार्दिक मुंबईच्या संघाचा सदस्य होता. यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, "माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की, मी पाचवेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे आणि प्रत्येक वेळी विजयी संघाचा भाग ठरलो आहे."
हार्दिक पांड्याचं दमदार प्रदर्शन
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्यानं त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केला आहे. या हंगामात त्यानं तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी केली आहे. हार्दिक पांड्यानं या हंगामात 15 सामन्यात 487 धावा केल्या आहेत. यादरम्यान पंड्याचा स्ट्राइक रेट 131.27 होता. तर, सरासरी 44.27 होती. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत हार्दिक पांड्या चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय या हंगामात त्यानं आठ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.
हे देखील वाचा-