IPL 2022 : गावसकरांनी हार्दिक पांड्याची तुलना केली रोहित शर्मासोबत, पाहा काय म्हणाले
Sunil Gavaskar On Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीवर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर प्रभावित झाले आहेत.
Sunil Gavaskar On Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीवर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर प्रभावित झाले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सुनील गावसकरांनी कौतुक केलेय. आयपीएलध्ये हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सांभाळत आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने आठ सामन्यात सात विजय मिळवले आहे. 14 गुणांसह गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने ज्या पद्धतीने गुजरातचे नेतृत्व केलेय, त्यामुळे सुनील गावसकर यांनी त्याची तुलना रोहित शर्मासोबत केली आहे.
हार्दिक पांड्याचे कौतुक करताना गावसकर म्हणाले की, 'कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने मुंबईला पाच वेळा आयपीएल चषक जिंकून दिलाय. रोहित शर्माप्रमाणेच हार्दिक पांड्याही करिश्मा करु शकतो.'
आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला जवळून पाहात आहे. 2013 मध्ये रोहित शर्मालाही जवळून पाहिले होते. तेव्हा रोहित शर्माकडे मुंबईचे कर्णधारपद आले होते. त्यावेळी रोहित शर्माने आपल्या खेळात सुधारणा केली होती. तो एक दर्जेदार कर्णधार म्हणून समोर आला. रोहित शर्माप्रमाणेच हार्दिक पांड्याही करिश्मा करु शकतो. कर्णधारपद सांभाळल्यानंतर हार्दिक पांड्याची फलंदाजीही सुधारली आहे. शॉट सिलिकेशन व्यवस्थित झालेय. हार्दिक चांगला फिल्डरही आहे. त्याच्या विविध गुणांमुळेच गुजरात चांगली कामगिरी करत आहे.
कैफनेही केले कौतुक -
हार्दिक पांड्याबाबत बोलताना भारताचा माजी खेलाडू मोहम्मद कैफ याने कौतुक केले आहे. हार्दिक पांड्याच्या फंलदाजीत बदल झालाय. फलंदाजीत हार्दिककडे सर्व प्रकराचे शॉट आहेत.
हे देखील वाचा-