GT Vs RCB: 'चिते की चाल, बाज की नजर और विराट...' किंग कोहलीचं अर्धशतक, बंगळुरूचं गुजरातसमोर 171 धावांचं लक्ष्य
GT Vs RCB: या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
![GT Vs RCB: 'चिते की चाल, बाज की नजर और विराट...' किंग कोहलीचं अर्धशतक, बंगळुरूचं गुजरातसमोर 171 धावांचं लक्ष्य GT Vs RCB: Gujarat Titans need 171 runs to win against Royal Challengers Bangalore GT Vs RCB: 'चिते की चाल, बाज की नजर और विराट...' किंग कोहलीचं अर्धशतक, बंगळुरूचं गुजरातसमोर 171 धावांचं लक्ष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/12/ff728934794c6a9b08b3efcd6f2ebd6e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
GT Vs RCB: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गुजरात टायटन्स समोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेटस् गमावून धावा केल्या. या सामन्यात बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली गुजरातच्या गोलंदाजांवर चांगलाच बरसला. विराटची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांत होती. मात्र, गुजरातविरुद्ध सामन्यात विराटनं संयमी फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केलं.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या संघाची सुरुवात खराब झाली. बंगळुरूच्या डावातील दुसऱ्याच षटकात कर्णधार फाफ डू प्लेसिस गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदारनं संघाचा डाव सावरला. या सामन्यात विराट कोहलीनं 58 तर, रजत पाटीदानं 52 धावांची खेळी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं छोटीशी 33 धावांची आक्रमक खेळी केली. ज्यामुळं बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून सांगवाननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद शाम, अल्झारी जोसेफ, राशीद खान आणि लॉकी फॉर्ग्युसन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन:
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन:
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेट किपर) हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)