Gill Run out: : ऋषी धवनच्या 'डायरेक्ट हिट'चा शिकार ठरला शुभमन गिल, पाहा कसा झाला रनआउट?
IPL 2022: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (Gujarat Titans vs Punjab Kings) यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 वा सामना सुरू आहे.
IPL 2022: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (Gujarat Titans vs Punjab Kings) यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 वा सामना सुरू आहे. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबविरुद्ध सामन्यात गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिलच्या रुपात गुजरातच्या संघाला पहिला झटका बसला. ऋषी धवननं शुभमन गिलला रन आऊट केलं आहे. शुभमन गिल आऊट झाल्याचा व्हिडिओ आयपीएलनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जात आहे.
नाणेफेक जिंकून गुजरातकडून सलामीवीर वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल मैदानात आले. परंतु, या सामन्यातील तिसऱ्या षटकात पंजाबचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलनं शॉट मारून धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही अंतरावर उभा असलेल्या ऋषी धवननं चेंडू रोखून स्टंपच्या दिशेनं थ्रो केला आणि शुभमन गिल धावबाद झाला. या सामन्यात शुभमन गिलनं 9 धावा करून पव्हेलियनमध्ये परतला.
व्हिडिओ-
शुभमन गिलची कामगिरी
या हंगामात शुभमन गिलनं गुजरातकडून 10 सामने खेळले आहेत. ज्यात 269 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. एका सामन्यात त्याचं चार धावांनी शतक हुकलं आहे. आयपीएलमधील त्यानं त्याच्या कारकिर्दितील सर्वश्रेष्ठ 96 धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाबचा संघ कितव्या क्रमांकावर?
आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. तर, पंजाबचा संघ 8 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. गुजरातच्या संघानं प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं आहे. तर, गुजरातविरुद्ध आजचा सामना जिंकल्यानंतर पंजाबचे 10 गुण होतील.
हे देखील वाचा-
- West Indies New Captain : पोलार्डच्या निवृत्तीनंतर वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार निकोलस पूरन; एकदिवसीय संघासह टी20 संघाची मिळाली जबाबदारी
- Cristiano Ronaldo: 'आय एम नॉट फिनिश' ब्रेंटफोर्डविरुद्द दमदार कामगिरीनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणाला...
- GT vs PBKS, Toss Update : हार्दिकची फौज प्रथम फलंदाजीसाठी सज्ज; नाणेफेक जिंकत घेतला निर्णय, पाहा आजची अंतिम 11