(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gujarat Titans Roadshow: चॅम्पियन गुजरातचा रोड शो! ट्राफीसह अहमदाबादच्या रस्त्यावर दिसणार संपूर्ण संघ
Gujarat Titans Roadshow: गुजरात टायटन्सच्या संघानं पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलचा खिताब जिंकून इतिहास रचला.
Gujarat Titans Roadshow: गुजरात टायटन्सच्या संघानं पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलचा खिताब जिंकून इतिहास रचला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघानं राजस्थान रॉयल्सचा अंतिम सामन्यात सात विकेट्सनं पराभूत केलं. या विजयानंतर अहमदाबादच्या रस्त्यावर विजयी ट्रॉफी घेऊन गुजरातचा संघ आज रोड शो करणार आहे. या रोड शोमध्ये गुजरातचे सर्व खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
ट्वीट-
गुजरात टायटन्सचा सात विकेट्सनं विजय
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सॅमसनचा हा निर्णय चुकीचा ठरला. राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 9 विकेट्स गमावून केवळ 130 धावा करता आल्या. गुजरात टायटन्सनं हे लक्ष्य 18.1 षटकांत सात विकेट्स राखून पूर्ण केलं.
हार्दिक पांड्याला सामनावीराचा पुरस्कार
सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्यानं 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. याशिवाय त्यानं फलंदाजीत 30 चेंडूत 34 धावा केल्या. ज्यामुळं त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
गुजरातच्या विजयानंतर नताशा स्तांकोविक
नताशा स्तांकोविकला पती हार्दिकच्या यशाबद्दल अश्रू आवरता आले नाहीत. शुभमन गिलनं षटकार ठोकून गुजरातला चॅम्पियन बनवताच हार्दिक पांड्यासह बाकीच्या खेळाडूंनी मैदानात आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, खेळाडूंचे कुटुंबीयही मैदानात उतरू लागले. नताशा मैदानावर पोहोचल्यावर तिनं लगेचचं हार्दिकला मिठी मारली. त्यावेळी तो खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या भावनिक सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केले जात आहेत.
हे देखील वाचा-