IPL 2022 : गुजरात-राजस्थानचा साखळी फेरीतील प्रवास कसा होता?
GT vs RR, IPL 2022 : हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांच्यामध्ये क्लालिफायर 1 ची लढत होणार आहे.... या दोन्ही संघाचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता?
GT vs RR, IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल यांच्यात आज क्लालिफायर 1 चा सामना रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ लढणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत संघाला क्लाविफायर 2 खेळण्याची संधी मिळणार आहे.
GUJARAT TITANS, IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने पदार्पणाच्या आयपीएल हंगामात दमदार कामगिरी केली. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. साखळी फेरीत गुजरातच्या संघाने 10 विजय मिळवले तर फक्त चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
GUJARAT TITANS ची साखळी फेरीतील कामगिरी -
गुजरातने लखनौचा पाच विकेट आणि दोन चेंडू राखून केला पराभव
दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला.
गुजरातचा पंजाबवर सहा विकेटने विजय
हैदराबादचा गुजरातवर आठ विकेट आणि पाच चेंडू राखून विजय
गुजरातकडून राजस्थानचा 37 धावांनी पराभव
हार्दिकच्या गुजरातचा चेन्नईवर तीन विकेटने विजय
कोलकात्याचा गुजरातकडून आठ धावांनी पराभव
गुजरातचा हैदराबादवर पाच विकेटने विजय
आरसीबीचा गुजरातकडून सहा विकेटने पराभव
पंजाबचा गुजरातवर आठ विकेटने विजय
मुंबईकडून गुजरातचा पाच धावांनी पराभव
गुजरातचा लखनौवर 62 धावांनी पराभव
गुजरातचा चेन्नईवर सात विकेट आणि पाच चेंडू राखून विजय
फाफच्या नेतृत्वातील आरसीबीचा गुजरातवर आठ विकेटने विजय
RAJASTHAN ROYALS IPL 2022 : संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने यंदा दमदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. राजस्थानने 18 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान काबिज केलेय. जोस बटलरने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. तर चाहलने सर्वाधिक विकेट घेतल्या आहे. साखळी फेरीत पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप राजस्थानच्या खेळाडूकडे आहे... त्यावरुन राजस्थान संघाची कामगिरी कशी झाली असेल याचा अंदाज लावू शकता.. राजस्थान संघाने 14 सामन्यात 9 विजय आणि पाच सामन्यात पराभव स्वीकाराला आहे.
RAJASTHAN ROYALS - ची साखळी फेरीतील कामगिरी -
राजस्थानचा हैदराबादवर 61 धावांनी विजय
राजस्थानकडून मुंबईचा 23 धावांनी पराभव
आरसीबीचा राजस्थानवर चार विकेटने विजय
लखनौचा राजस्थानकडून तीन धावांनी पराभव
गुजरातचा लखनौवर 37 धावांनी विजय
कोलकात्यावर राजस्थानचा सात धावांनी विजय
दिल्लीवर राजस्थानचा 15 धावांनी विजय
आरसीबीचा 29 धावांनी पराभव
मुंबईचा राजस्थानवर पाच विकेटने विजय
कोलकात्याचा सात विकेटने विजय
पंजाबचा सहा गड्यांनी पराभव
दिल्लीचा आठ विकेटने विजय
राजस्थानचा लखनौवर 24 धावांनी विजय
चैन्नईवर पाच गड्यांनी मात