एक्स्प्लोर

GT vs DC : पंतने नाणेफेक जिंकली, हार्दिकच्या संघाची प्रथम फलंदाजी, दिल्लीच्या संघात एक बदल

GT vs DC IPL 2022 : आजच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

GT vs DC IPL 2022 : आजच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर गुजरात आणि दिल्लीमध्ये सामना होत आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. गुजरात आणि दिल्लीचा संघ विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. 

गुजरातने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. गुजरातचा विजयी संघ कायम आहे. तर दिल्लीच्या संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. कमलेश नागरकोटेच्या जागी दिल्लीने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संधी दिली आहे. 

पिच रिपोर्ट - 
पुण्यातील एमसीए क्रिकेटचं मैदान सुरुवातीला फलंदाजीसाठी पोषक आहे. त्यानंतर येथे फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहतो. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मदत मिळतो. दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 80 टक्के जिंकला आहे. 

दिल्लीचे 11 शिलेदार (Delhi Capitals )
पृथ्वी शॉ, टीम शेफर्ट, मनदीप सिंह, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), रोमेन प़वेल, ललीत यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजूर रहमान  

गुजरातचे 11 शिलेदार 
शुबमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, वरुण अॅरोन, लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी 

दिल्लीची ताकद अन् कमजोरी काय?
दिल्लीची सर्वात मोठी ताकद सलामी जोडी होऊ शकते. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर हे विस्फोटक फलंदाज कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करण्यास सक्षम आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतचा फॉर्म दिल्लीसाठी जमेजी बाजू आहे. गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास, दिल्लीकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकुर आणि खलील अहमद यासारखे धुरंधर गोलंदाज दिल्लीकडे आहेत. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नाहीत. त्याशिवाय वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतीतून सावरलेला नाही. आयपीएलमध्ये तो खेळणार की नाही? यावर सस्पेन्स आहे. 

गुजरातची ताकद, कमकुवत बाजू?

गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांच्याकडे असणारा बोलिगं अटॅक त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण संघात जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान आहे. सोबत वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज आहेत. नवखा पण उत्तम असा अल्झारी जोसेफही गुजरातमध्ये असून अनुभवी जयंत यादव आणि आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राहुल तेवतिया संघात आहे. संघात सलामीवीरांचा प्रश्न काहीसा कठीण आहे. कारण नुकताच जेसन रॉय याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकट्या शुभमनवर सलामीची जबाबदारी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte Holi : रंग लावले, पप्पीचा प्रयत्न, सदावर्ते कपलची हटके होळी, FULL VIDEORaj Thackeray Holi : राज ठाकरेंची धुळवड,'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं FULL VIDEOABP Majha Headlines : 01 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Embed widget