(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB Captain : अखेर आरसीबीने निवडला कर्णधार, 'या' खेळाडूकडे दिली जबाबदारी
RCB Captain : आयपीएलचं बिगुल वाजले आहे. 26 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. आरसीबी वगळता प्रत्येक संघाने आपला कर्णधार निवडला होता. आता आरसीबीनेही आपला कर्णधार निवडला आहे
RCB Captain : आयपीएलचं बिगुल वाजले आहे. 26 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. आरसीबी वगळता प्रत्येक संघाने आपला कर्णधार निवडला होता. आता आरसीबीनेही आपला कर्णधार निवडला आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीने संघाची धुरा नव्या खेळाडूकडे सोपवली आहे. आरसीबीने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि दिनेश कार्तिक हेही कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मॅक्सवेल सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नसणार आहे. प्लेसिसला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा मेगा लिलाव बंगळुरूमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडला होता. त्यामध्ये आरसीबीने फाफ डु प्लेसिसला आपल्या संघात घेतले होते. आता त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फाफने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पेलली आहे. ड्युप्लेसिसच्या अनुभवामुळे त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
The Leader of the Pride is here!
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 12, 2022
Captain of RCB, @faf1307! 🔥#PlayBold #RCBCaptain #RCBUnbox #ForOur12thMan #UnboxTheBold pic.twitter.com/UfmrHBrZcb
विराटने सोडले होते कर्णधारपद -
विराटन आयपीएलच्या चौदाव्या हंगामानंतर आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. स्वत:साठी काही वेळ काढण्यासाठी आणि काही प्रमाणात कार्यभार कमी करण्याच्या उद्देशानं विराटनं आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आरसीबीने नवीन कर्णधार निवडला आहे.
असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ -
शिलेदार – विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), मोहम्मद सिराज (सात कोटी), फाफ ड्यू प्लेसी (७ कोटी), हर्षल पटेल (१०.७५ कोटी), वानिंदू हसारंगा (१०.७५ कोटी), दिनेश कार्तिक (५.५० कोटी), जोश हेझलवूड (७.७५ कोटी), शाहबाज अहमद (२.४ कोटी), अनुज रावत (३.४ कोटी), आकाशदीप (२० लाख), फिन अलन (८० लाख), शेरफन रुदरफर्ड (१ कोटी), जेसन बेहरनडॉर्फ (७५ लाख), सुयश प्रभुदेसाई (३० लाख), अनीश्वर गौतम (२० लाख)