(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्लीत भेदक गोलंदाज परतला, राजस्थानचा स्फोटक फलंदाज बाहेर, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
DC vs RR Score Live Updates: राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
DC vs RR Score Live Updates: राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दिल्लीचा आजचा सामन्यात विजय अनिवार्य असेल, तर दुसरीकडे राजस्थानचा संघ प्लेऑफमधील आव्हान निश्चित करण्यासाठी उतरणार आहे. दोन्ही संघामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रंगतदार सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे दिल्ली आणि राजस्थानच्या खेळाडूंचं लक्ष असेल.
राजस्थान अन् दिल्लीच्या संघात महत्वाचे बदल
राजस्थानच्या संघात दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहे. ध्रुव जुरेल आणि शिमरोन हेटमायर दुखापतग्रस्त झाले आहेत, त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये नाहीत. त्यांच्या जागी राजस्थानच्या संघात शुभम दुबे आणि डेनवोन फरेरा यांना स्थान दिलेय. दुसरीकडे दिल्लीच्या ताफ्यातही बदल करण्यात आला आहे. ईशांत शर्मा, गुलबदीन नईब यांना संधी मिळाली आहे.
गुणतालिकेची स्थिती काय ?
राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. राजस्थानच्या नावावर 16 गुण आहेत, राजस्थान संघ गुणातलिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानचा संघ आजचा सामना जिंकून अव्वल स्थानावर पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. दिल्लीचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दिल्लीला आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे. दिल्लीने 11 सामन्यात पाच विजय आणि सहा पराभव स्विकारले आहेत. दिल्लीचा संघ 10 गुणांसह सहाव्या स्थानावर विराजमान आहे.
राजस्थान रॉयल्सच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण?
यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल
राखीव खेळाडू - जोस बटलर, कुलदीप सेन, कोटियन, राठोड
1 Rovman Powell, 2 Yashasvi Jaiswal, 3 Sanju Samson (capt & wk), 4 Riyan Parag, 5 Shubham Dubey, 6 Donovan Ferreira, 7 R Ashwin, 8 Trent Boult, 9 Avesh Khan, 10 Sandeep Sharma, 11 Yuzvendra Chahal.
Impact Subs: Buttler, Sen, Kotian, Kohler-Cadmore and Rathore
दिल्लीच्या ताफ्यात कोणते 11 खेळाडू ?
जेक प्रेसर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), गुलबदीन नईब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ईशांत शर्मा, खलील अहमद
राखीव खेळाडू - सलाम, कुमार कुशाग्र, प्रवीन, सुमीत आणि ललीत
DC: 1 Jake Fraser-McGurk, 2 Abishek Porel, 3 Shai Hope, 4 Tristan Stubbs, 5 Rishabh Pant (capt, wk), 6 Gulbadin Naib, 7 Axar Patel 8 Kuldeep Yadav, 9 Mukesh Kumar, 10 Ishant Sharma, 11 Khaleel Ahmed.
Impact Subs: Salam, Kushagra, Praveen, Sumit and Lalit