DC vs SRH : दिल्लीचा 'कर्दनकाळ' ठरला वॉशिंग्टन सुंदर, एका षटकात 3 गडी बाद; पाहा Video
IPL 2023 : दिल्ली (DC) विरुद्ध हैदराबाद (SRH) सामन्यात हैदराबादच्या वॉशिंग्टन सुंदरने दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह तिघांना एकाच षटकात बाद केलं.
![DC vs SRH : दिल्लीचा 'कर्दनकाळ' ठरला वॉशिंग्टन सुंदर, एका षटकात 3 गडी बाद; पाहा Video DC vs SRH dc captain warner sarfaraz aman dismissed in single over spell srh washington sundar watch video 2023 IPL live marathi news DC vs SRH : दिल्लीचा 'कर्दनकाळ' ठरला वॉशिंग्टन सुंदर, एका षटकात 3 गडी बाद; पाहा Video](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/0254bb22512fbb1d93ec54a1c9c28cfe1682392426817322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
DC vs SRH IPL 2023 : आयपीएलमध्ये (IPL 2023) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सामन्यात वॉशिंग्टन सुंदर दिल्लीचा कर्दनकाळ ठरला. हैदराबादचा धडाकेबाज गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह तिघांना एकाच षटकात बाद केलं. आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने पाहायला मिळाले.
DC vs SRH, Match 34 : दिल्लीचा कर्दनकाळ ठरला वॉशिंग्टन सुंदर
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाने गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. सलामीवीर फलंदाज फिलिप सॉल्ट डावाच्या पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर सनरायझर्स हैदराबादचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर डावाच्या आठव्या षटकात दिल्ली कॅपिटल्ससाठी 'काळ' बनून आला. वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात दिल्लीचा कर्णधार वॉर्नरसह तीन फलंदाजांना बाद केलं.
आठव्या षटकात वॉशिंग्टन सुंदरची चमकदार कामगिरी
आठव्या षटकात हैदराबादच्या वॉशिंग्टन सुंदरने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान आणि अमन हकीम खान यांची विकेट घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुंदरने दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा बळी घेतला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर सरफराज खान आणि शेवटच्या चेंडूवर अमन हकीम खानला झेलबाद करून तंबूत माघारी पाठवलं. दिल्लीचा कर्णधार वॉर्नर 21 धावा करून, सरफराज खान 10 धावा करून आणि अमन 4 धावा करून बाद झाला.
पाहा Video : वॉशिंग्टन सुंदरकडून एका षटकात 3 गडी बाद
David Warner ✅
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
Sarfaraz Khan ✅
Aman Khan ✅
That was one stunning over from @Sundarwashi5 👌 👌
Watch those WICKETS 👇
Follow the match ▶️ https://t.co/ia1GLIWu00 #TATAIPL | #SRHvDC | @SunRisers pic.twitter.com/wXgFVCmCoS
IPL 2023, SRH vs Dc : दिल्ली कॅपिटल्सकडून हैदराबादचा पराभव
आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावांचं लक्ष्य दिलं. लक्ष्याचा पाठलाग हैदराबादचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 137 धावा करू शकला. यासह दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे. दरम्यान, या विजयानंतर गुणतालिकेतील संघांच्या स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली कॅपिटल्स पॉईंट्स टेबलमध्ये अद्यापही सर्वात शेवटी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)