CSK Record at Chepauk : चेन्नई घरच्या मैदानावर अजिंक्यच, चेपॉकवर सर्व सहा सामने जिंकण्याचा विक्रम
CSK Record Chepauk Stadium : चेन्नई सुपर किंग्स संघाचा घरच्या मैदानावर विक्रम रचला आहे. चेपॉक मैदानावर खेळलेले सर्व सहा सामने जिंकले आहेत.
CSK Won All Six Matches on Chepauk : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. चेन्नईने घरच्या मैदानावर लखनौला 12 धावांनी हरवलं. चेन्नईच्या एमए चिदंबरम स़्डेडिअम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर हा रोमहर्षक सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्स संघाचा घरच्या मैदानावर विक्रम रचला आहे. चेपॉक मैदानावर खेळलेले सर्व सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे लखनौ विरुद्धच्या सामन्यातील विजयासह चेन्नई घरच्या मैदानावर अजिंक्यच ठरला आहे.
CSK Record Chepauk Stadium : चेपॉकवर सर्व सहा सामने जिंकण्याचा चेन्नईचा विक्रम
चार वर्षानंतर चेन्नईचा संघ चेपॉक स्टोडिअमवर उतरला आणि रोमांचक सामन्यात चेन्नईने लखनौवर 12 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर उतरून विजय मिळवला. चेन्नईचा संघ 2019 नंतर या मैदानावर खेळायला उतरला होता. चेन्नईने दमदार घरवापसी करत लखनौला रोमहर्षक सामन्यात पराभूत केलं. मराठमोळा ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली हे विजयाचे शिल्पकार ठरले. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स संघाने चेपॉक स्टेडिअमवर खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत.
CSK While Defending 200+ at Chepauk
— Broken Cricket (@BrokenCricket) April 3, 2023
Won - 6
Lost - 0
घरच्या मैदानावर चेन्नईने जिंकले सर्वाधिक सामने
चेन्नई सुपर किंग्सचा घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने चेन्नईने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर खेळताना चेन्नई संघाने 72 टक्के सामने जिंकले आहेत. यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा क्रमांक लागतो. राजस्थान संघाचं घरच्या मैदानावर सामना जिंकण्याचं प्रमाण 68 टक्के आहे.
Highest Win % at Home Venue
— Broken Cricket (@BrokenCricket) April 3, 2023
72% - Chennai Super Kings*
68% - Rajasthan Royals
67% - Sunrisers Hyderabad
62% - Mumbai Indians
IPL 2023, CSK vs LSG : ऋतुराज आणि मोईन अली ठरले 'हिरो'
या सामन्यात ऋतुराजने 57 धावांची दमदार खेळी केली, तर मोईन अलीने 19 धावा केल्या. सोमवारी झालेल्या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरली. चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीवीरांनी या सामन्याची आक्रमक सुरुवात केली. 'येलो आर्मी'मधील सलामीवीर ऋतुराज गायकवाडने मैदानात षटकारांचा वर्षाव करत लखनौच्या गोलंदाजांना पछाडलं. यामुळे CSK ने 10 षटकांपूर्वीच 100 धावांचा आकडा गाठला. ऋतुराज गायकवाडने लखनौविरोधात दमदार अर्धशतकी खेळी केली. आयपीएल 2023 मधील त्याची ही सलग दुसरी अर्धशतकी खेळी आहे.
IPL 2023, CSK vs LSG : चेन्नईनं पहिल्या विजयासह खातं उघडलं
मोईन अलीने 19 धावांची छोटेखानी दमदार खेळी केली. त्याने 13 चेंडूमध्ये तीन चौकार ठोकले. आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघाचा हा पहिला विजय आहे. याआधी गेल्या वर्षी दोन्ही संघांमध्ये एक सामना झाला होता. त्यामध्ये लखनौकडून चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई संघाचं घरच्या मैदानावर वर्चस्व आहे. या मैदानावर चेन्नईने एकूण 22 पैकी 19 सामने जिंकले आहेत. केवळ तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे.