एक्स्प्लोर

CSK vs GT : अंतिम सामन्यावर पुन्हा पावसाचं सावट! सोमवारीही सामना रद्द झाल्यास विजेता कोण ठरणार?

IPL Final 2023 : आज आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. सोमवारीही पावसानं सामन्यात व्यत्यय आणल्यास विजेता कसा ठरणार? जाणून घ्या.

CSK vs GT, IPL 2023 Final Match : रविवारी झालेल्या पावसामुळे अहमदाबादमधील (Ahmedabad Rain) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील आयपीएल 2023 चा अंतिम सामना (IPL 2023 Final ) होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना आज, सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. रविवारी पावसानं प्रेक्षकांची निराशा केली. आज 29 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट आहे. सोमवारीही आयपीएल 2023 चा अंतिम सामना होऊ शकला नाही. तर, पुढे काय होणार... कोणता संघ महाविजेता ठरणार जाणून घ्या...

सोमवारीही पाऊस पडल्यास काय होणार?

आयपीएल 2023 चा अंतिम सामना सोमवारी, 29 मे रोजी राखीव दिवशीही होऊ शकला नाही, तर गुजरात टायटन्स संघाला याचा फायदा होईल. सोमवारीही महाअंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास साखळी सामन्यानंतर आयपीएल गुणतालिकेतील (IPL 2023 Points Table) पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला महाविजेता म्हणून घोषित केलं जाईल. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सध्या गुजरात टायटन्स संघ अव्वल आहे. त्यामुळे सोमवारी अंतिम सामना न झाल्यास चेन्नई सुपर किंग्स संघाला याचं नुकसान सहन करावं लागेल. यामुळे गुजरात टायटन्स आयपीएल 2023 चा विजेता ठरेल, कारण चेन्नई पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात संघ आघाडीवर

आयपीएल 2023 मध्ये सामील सर्व दहा संघाने प्रत्येकी 14 साखळी सामने खेळले. या साखळी सामन्यानंतर गुजरात संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला. 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून गुजरात टायटन्स 20 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात संघाला चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्स 14 सामन्यांपैकी 8 सामने जिंकल्यानंतर 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई संघाने चौदापैकी पाच सामने गमावले तर, एका सामना पावसामुळे रद्द झाला होता. लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना पावसामुळे होऊ न शकल्याने दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Final : आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला, पावसामुळे रविवारचा सामना सोमवारी; चेन्नई की गुजरात कोण ठरणार चॅम्पियन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
Embed widget