Cameron Green : मुंबईकडून 17.50 कोटींची बोली, आता पैसा वसूल झलक, कॅमरुन ग्रीननं घेतल्या 5 विकेट्स
AUS vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु बॉक्सिंग डे कसोटीत कॅमरुन ग्रीननं पहिल्या डावात पाच विकेट्स घेत दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं आहे.
Cameron Green Fantastic Bowling : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरुन ग्रीनसाठी हा सामना संस्मरणीय ठरला आहे. कारण त्याने या सामन्यात तब्बल 5 विकेट्स घेत अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स संघानं (Mumbai Indians) आयपीएल 2023 (IPL 2023) साठीच्या लिलावात तब्बल 17.50 कोटी रुपये खर्चून ग्रीनला संघात सामिल केलं आणि त्यानंतर लगेचच त्याने ही कमाल कामगिरी केल्यानं मुंबई इंडियन्स व्यवस्थापनासह चाहते नक्कीच आनंदी झाले आहेत.
बॉक्सिंग डे कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना कॅमरुन ग्रीनने 5 बळी घेतले. ग्रीनने 10.4 षटकात गोलंदाजी करताना 3 मेडन्स ठेवत 27 धावांत 5 खेळाडू बाद केले. त्याची आतापर्यंतची कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. यादरम्यान त्याने थेव्हिन्स डी ब्रुयन, काइल व्हर्न, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना बाद केले. कॅमेरून ग्रीनने आता कसोटी क्रिकेटमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत. डिसेंबर 2020 मध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणारा ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी मॅचविन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
दिल्लीशी लढून मुंबईनं घेतलं कॅमरुनला
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीनवर मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडला आहे. ग्रीनला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी लढत झाली, ज्यामध्ये मुंबईने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि त्याला संघात सामील करण्यासाठी 17.50 कोटी रुपये खर्च केले. ग्रीनचे नाव समोर येताच, सर्व संघानी इतक्या वेगाने बोली लावली पाहता पाहत 10 कोटींचा टप्पा ओलांडला. ज्यानंतर अखेर तो 17.50 कोटींना विकला गेला. सॅमनंतर सर्वात महागडा खेळाडू ग्रीन ठरला आहे.
लिलावात मुंबई इंडियन्सनं विकत घेतलेले खेळाडू - कॅमरुन ग्रीन (17.5 कोटी), नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद (20 लाख), डुआन जेंसन (20 लाख), पीयूष चावला (50 लाख), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), राघव गोयल (20 लाख).
हे देखील वाचा-