एक्स्प्लोर

IPL 2024 : आयपीएलमध्ये 17 वर्षात एकाही भारतीयाला जे जमलं नाही ते करुन दाखवलं, आशुतोष शर्मानं इतिहास रचला 

IPL 2024 : पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स  यांच्यात आयपीएलमधील 33 वी मॅच पार पडली. या मॅचमध्ये आशुतोषनं 61 धावांची खेळी केली.  

चंदीगड : आयपीएलच्या (IPL 2024 )17 व्या  पर्वात देखील पंजाब किंग्जची (Punjab Kings) कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. पंजाबला सातपैकी पाच मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे. पंजाबला केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. पंजाबची कामगिरी चांगली नसली तरी दोन खेळाडूंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये शशांक सिंह आणि आशुतोष शर्माच्या (Ashutosh Sharma) नावाचा समावेश आहे. आशुतोष शर्मानं मुंबई इंडियन्स विरुद्ध 61 धावांची खेळी केली. 

आशुतोष शर्मानं कोणता विक्रम रचला?

आयपीएलमध्ये काल झालेल्या मॅचमध्ये 61 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या आशुतोष शर्मानं गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून पदार्पण केलं होतं. आशुतोष शर्मानं आतापर्यंत चार मॅचध्ये फलंदाजी केली आहे. आशुतोषला पंजाबनं आठव्या स्थानावर फलंदाजी करण्याची संधी दिलेली आहे. या स्थानावर फलंदाजी करताना आशुतोष शर्मानं 52 च्या सरासरीनं 156 धावा केल्या आहेत. मुंबई विरुद्ध त्यानं 61 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर गेल्या  17 वर्षात कोणत्याही भारतीय खेळाडूला न जमलेला विक्रम आशुतोष शर्मानं करुन दाखवला आहे. 

आशुतोष शर्मानं आयपीएलमध्ये आठव्या स्थानावर फलंदाजी करताना 100 धावांचा टप्पा पूर्ण केलाआहे.आठव्या स्थानावर फलंदाजी करताना 100 धावांचा टप्पा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात एकाही भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. 

आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या दुसऱ्या खेळाडूचं नाव राशिद खान आहे. राशिद  खाननं 2023 च्या आयपीएलमध्ये  आठव्या स्थानावर फलंदाजी करताना 100 हून अधिक धावा केल्या होत्या. आशुतोष शर्मानं 4 डावात 205.26 स्ट्राइक रेटनं 156 धावा केल्या आहेत. आशुतोष शर्माला पंजाब किंग्जनं लिलावात 20 लाख रुपयांना टीममध्ये घेतलं होतं. 

आशुतोष शर्माची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 मध्ये आशुतोष शर्मानं रेल्वेच्या टीमकडून सहभाग घेतला होता. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं  11 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आशुतोष शर्मानं 12  बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली होती. त्यामध्ये आशुतोष शर्मानं 8 षटकार आणि 1 चौकार मारला होता. आशुतोष शर्मानं टी 20 मध्ये 19 मॅचमध्ये 33.82 च्या सरासरीनं 575 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. 

शिखर धवन च्या नेतृत्त्वात यंदाचं आयपीएल खेळणाऱ्या पंजाब चांगली कामगिरी करता आलेली नाही. पंजाब किंग्जला आतापर्यंत केवळ दोन मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. सध्या शिखर धवन जखमी असून त्याच्या जागी सॅम कर्रननं नेतृत्त्व करत आहे. 

संबंधित बातम्या : 

रोहित शर्माला वाचवलं, स्वत :ची विकेट वाचवली, सूर्यकुमार यादवची तत्परता, मुंबईसाठी ठरली गेमचेंजर

सूर्यानं घेतलेला डीआरएस वादाच्या भोवऱ्यात? मुंबई इंडियन्सच्या तीन शिलेदारांची चलाखी सापडली, पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
×
Embed widget