Virat Kohli- Anushka Sharma: अनुष्कासोबत वर्कआऊट करताना दिसला विराट कोहली, शेअर केलेल्या व्हिडिओला दिलं जबराट कॅप्शन
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चांगली सुरुवात करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal Challengers Bangalore) संघाला मागील तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चांगली सुरुवात करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal Challengers Bangalore) संघाला मागील तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात बंगळुरूच्या संघानं आतापर्यंत दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर, पाच सामन्यात पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे, यंदाचा हंगाम आरसीबीच्या माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खराब ठरला आहे. दहा सामने खेळलेल्या विराट कोहलीला फक्त एकाच सामन्यात अर्धशतक करण्यात आलं आहे. याचदरम्यान, पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) वर्कआऊट करतानाचा विराट कोहलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकताच विराट कोहलीनं ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात तो त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडिओला विराटनं 'बॅक टू माय फेव्हरेट' असं कॅप्शन देत अनुष्का शर्माला टॅग केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर, काही जण या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्काच्या जोडीचा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.
पाहा व्हिडिओ-
विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आरसीबीकडून आतापर्यंत दहा सामने खेळले असून फक्त 186 धावा केल्या आहेत. ज्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर, या हंगामात त्यानं 58 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी विराट कोहलीनं आरसीबीच्या संघाचं कर्णधार पद सोडलं आणि आता तो फलंदाजीमध्येही संघर्ष करताना दिसत आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022: संजू सॅमसनला क्रिकेटर बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी सोडली नोकरी, वाचा राजस्थानच्या कर्णधाराच्या संघर्षाची संपूर्ण कहाणी
- GT Vs PKBS, IPL 2022: गुजरातच्या गोलंदाजांशी एकटाच भिडला साई सुदर्शन, हार्दिकच्या संघाला विजयासाठी 143 धावांची गरज
- Gill Run out: : ऋषी धवनच्या 'डायरेक्ट हिट'चा शिकार ठरला शुभमन गिल, पाहा कसा झाला रनआउट?