(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2021 : कोरोना संकट असतानाही आयपीएलमध्ये अमाप पैसा ओतणाऱ्या फ्रँचायझींवर अँड्य्रू टायची तीव्र नाराजी
देशात सुरु असणारा कोरोनाचा कहर पाहता, याची झळ आता सर्वत स्तरांवर पोहोचू लागली आहे. याचेच पडसादही उमटू लागले आहेत.
IPL 2021 : आयपीएलमधून राजस्थानच्या संघाकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय यानं काही खासगी कारणं देत या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोरोनाची लाट भारतात भयावह वळणावर असतानाच त्यानं हा निर्णय घेतला. इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएलमध्ये फ्रँचायझीकडून मोठ्या प्रमाणात पैसा उधळला जात आहे. याचवेळी देशात वैद्यकिय सुविधांअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे, ही दाहक परिस्थिती पाहता टायनं याबाबत नाराजीही व्यक्त केली.
आपण सर्वांच्याच मतांचा आणि विचारसरणीचा आदर करत असून, कोरोना काळात अनेकांसाठी आयपीएल हे मनोरंजनाचं साधन ठरत असल्यास ही स्पर्धा सुरुच ठेवावी, असंही मत त्यानं मांडलं. 'भारतीय दृष्टीकोनातून पाहायलं झाल्यास अनेक रुग्णांना रुग्णालयात जागाही मिळत नसताना या कंपन्या आणि फ्रँचायझी आयपीएलमध्ये इतरा पैसा ओततातच कशा?', असा प्रश्न cricket.com.au. शी संवाद साधताना त्यानं उपस्थित केला. आपल्याप्रमाणेच इतरांचीही मतं असतील असं नाही, त्यामुळं आपल प्रत्येकाच्याच मताचा आदर करत असल्याचंही तो न विसरता म्हणाला.
आपल्या देशात भारतातून गेलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन असणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून, आयपीएलमधून माघार घेण्यामागे हेसुद्धा एक कारण असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. फक्त टायच नव्हे, तर सध्या आयपीएलमध्ये इतरही खेळाडूंना कोरोनाचा वाढता कहर चिंतेत टाकत आहे.
जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी आणि देशाची बदनामी सहन केली जाणार नाही- संजय राऊत
दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड हसीचा हवाला देताना वृत्तपत्रात म्हटलं आहे की, प्रत्येक जण (ऑस्ट्रेलियन खेळाडू) ऑस्ट्रेलियामध्ये परत येऊ शकतो की नाही याबद्दल थोडे विचारात आहेत. खेळाडूंना ऑस्ट्रेलिया परत येण्याची थोडी काळजी असेल. भारतात काय घडत आहे याबद्दल प्रत्येकजण खूप चिंतीत आहे आणि ते व्यावहारिक देखील आहेत.
अश्विनचीही माघार
दिल्लीचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. अश्विनने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. माझं कुटुंब सध्या कोरोनाशी झुंज देत आहे आणि अशा कठीण प्रसंगी मला त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे, असं अश्विननं सांगितलं.