(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deepak Chahar: आयपीएलमधून बाहेर पडलेल्या दीपक चहरला 14 कोटी मिळणार का? येथे मिळवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर
Deepak Chahar: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज दीपक चहर आयपीएल 2022 मधून बाहेर झालाय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान दीपकच्या पायाला दुखापत झाली होती.
Deepak Chahar: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज दीपक चहर आयपीएल 2022 मधून बाहेर झालाय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान दीपकच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या क्वाड्रिसेप्स स्नायूंना दुखापत झाली होती. पुनर्वसनासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला. पायाची दुखापत बरी होत होती, पण त्यानंतर दीपकच्या पाठीला दुखापत झाली. ज्यामुळं त्याला आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला मुकावं लागलं आहे. दीपक चहर आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर एका अनोख्या चर्चेला आता उधाण आलं आहे. त्याला 14 कोटी मिळतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नईच्या संघानं दिपक चहरला रिलीज केलं होतं. मात्र, आयपीएलच्या मेगा आक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं दिपक चहरला 14 कोटीत विकत घेऊन पुन्हा संघात सामील केलं. दीपक चहर मुंबई इंडियन्सच्या इशान किशननंतर पंधराव्या हंगामातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. परंतु , दुखापतीमुळं त्याला आयपीएलमधून बाहेर पडावं लागलंय. महत्वाचं म्हणजे, त्यानं एकही सामना खेळला नसल्यानं त्याला हाती आलेले 14 कोटी गमवावे लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्शनमध्ये एखाद्या खेळाडूला ज्या किंमतीत खरेदी केलं जातं, त्याला दरवर्षी तेवढीच रक्कम मिळते. अर्थात दीपक चहरला तीन वर्षात 42 कोटी मिळाले असते. पण एखादा खेळाडू पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल, त्यालाच हे पैसे दिले जातात. मग त्या खेळाडूनं एकही सामना खेळला नसला तरी त्याला पैसे मिळतात.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दीपक चहरनं आयपीएलच्या पंधराव्या हंगामात एकही सामना खेळला नाही. मात्र, तो संपूर्ण 14 कोटी गमावणार नाही. त्याला या रक्कमेतील बऱ्यापैकी पैसे मिळतील, असं आश्वासनही अधिकाऱ्यानं दिलं आहे. तसेच “बीसीसीआयनं सर्व खेळाडूंच्या आयपीएल कराराचा विमा उतरवला आहे आणि ते प्रीमियम देखील भरत आहे. विम्याचे संपूर्ण 14 कोटी रुपये नसले तरी दीपक चांगली रक्कम मिळेल,” असंही सांगण्यात आलं आहे.
हे देखील वाचा-
- KL Rahul, MI vs LSG: केएल राहुलनं शतक ठोकून रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
- Andre Russell: पुन्हा आंद्रे रसलचं एका धावानं अर्धशतक हुकलं! त्याच्यासोबत किती वेळा असं घडलं? आकडा आश्चर्यचकीत करणारा
- Who is Aman Hakim Khan: अपघातानंतरही क्रिकेट सोडलं नाही, आयपीएलमध्ये पदार्पण करणारा अमन हाकीम खान आहे तरी कोण?