एक्स्प्लोर

Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन

Girish Mahajan on tree cutting in Nashik: उद्धव ठाकर एकीकडे म्हणतात माझा कुंभमेळ्याला माझा विरोध नाही. दुसरीकडे साधूग्रामसाठी झाडं तोडून देणार नाही, म्हणतात.

Girish Mahajan on Tapovan Trees: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील तब्बल 17 हजार झाडांवर कुऱ्हाड चालवणार जाणार आहे. यावरुन सध्या नाशिकमधील नागरिकांचे तीव्र आंदोलन उभे राहिले आहे. तपोवनातील अनेक वर्षांपासून असलेली झाडे (Tapovan Trees) काही दिवसांच्या कुंभमेळ्यासाठी तोडण्याला नाशिकमधील (Nashik news) नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महायुती सरकार आणि भाजपची बाजू मांडली. आम्हीसुद्धा वृक्षप्रेमी आहोत. सरकारची भूमिका, देवेंद्रजींची भूमिका, मोदीजींची भूमिका, याबाबत स्पष्ट आहे. आम्ही तपोवनातील तोडण्यात येणार्‍या झाडांच्या मोबदल्यात इतर ठिकाणी झाडं लावणार आहोत, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. ते शुक्रवारी मालेगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते. (Nashik Sadhugram news)

आम्ही पावसाळ्यात किती ठिकाणी वृक्ष लावतो. वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही. पण तपोवनातील जागा साधुग्रामसाठी शेकडो वर्षांपासून आरक्षित आहे. त्या ठिकाणी आता उगवून आलेली झाडे मागच्यावेळीही काढलेली होती. मोठी झाडे जी आहेत आम्ही त्या कोणालाही हात लावत नाही. जी झाडे या पाच-सात वर्षात उगवलेली आहेत, रोपटी आहेत त्यांनाच आम्ही हात लावणार आहोत. जे सात आठ वर्षातली प्लांटेशन आहेत ते आम्ही दुसरीकडे काढून लावणार आहोत. त्यासाठी चार-पाच जागा आम्ही शोधलेल्या आहेत. आम्ही कालपासून पंधरा हजार खड्डे करायला सुरुवात केली आहेत. मी स्वतः हैदराबादला जाऊन आठ फुटी, दहा फुटी झाडे आणून त्या ठिकाणी लावणार आहोत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

येत्या दोन वर्षात तपोवनात कसा बदल होणार, ते तुम्ही बघा. आम्ही येथील मोठी झाडं 100 टक्के जगवणार आहोत. साधूग्रामला ती जागा आवश्यक आहे, शेकडो वर्षापासून साधू तेथे राहत असल्याची ती परंपरा आहे. थोडी आमची ही भूमिका समजून घ्या. कुंभमेळा हा आपला सर्वात मोठा धार्मिक उत्सव सोहळा आहे. वृक्षतोड होईल त्यामुळे आम्ही वृक्षतोडण्याच्या मागे लागलो आहोत असे समजायचे काही कारण नाही. १०० टक्के सांगतो, एका झाडाला दहा नाही तर पंधरा झाडे लावतो. हजार झाडे तोडल्यावर आम्ही पंधरा हजार झाडे लावणार आहोत. जो खर्च येईल ती महापालिका या ठिकाणी करेल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

आणखी वाचा

श्रीराम तपोवनात झोपडीत राहिले होते, मग कुंभमेळ्यातील साधूंची व्यवस्था तशीच करा, झाडं कशाला कापता? दिग्दर्शक सचिन गोस्वामींचा संतप्त सवाल

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Nashik News: नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाचवा बळी, महापालिकेत जोरदार घमासान, 'तुम्ही सत्तेतून का बाहेर पडत नाही?' ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये बाचाबाची
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाचवा बळी, महापालिकेत जोरदार घमासान, 'तुम्ही सत्तेतून का बाहेर पडत नाही?' ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये बाचाबाची
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget