एक्स्प्लोर

IPL 2022 Closing Ceremony : वेळेपासून ते थीमपर्यंत, कोणते तारे अवतरणार? आयपीएल समारोपाच्या कार्यक्रमाशी संबधित A टू Z माहिती एका क्लिकवर

IPL 2022, Closing Ceremony: इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यासोबतच समारोपाच्या कार्यक्रमानेही सर्वांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.

RR vs GT, IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पण तत्पूर्वी याच ठिकाणी आयपीएल 2022 चा समारोप सोहळा अर्थात क्लोजिंग सेरेमनी (IPL 2022 Closing Ceremony) आयोजीत कऱण्यात आली आहे. या कार्यक्रमाला बॉलीवुड सेलिब्रिटींपासून ते अनेक दमदार आर्टिस्ट कार्यक्रम सादर करणार असून या कार्यक्रमाबद्दलचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत...

1. कधी आणि कुठे पाहाल IPL 2022 ची क्लोजिंग सेरेमनी?

हा कार्यक्रम आज सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटंनी सुरु होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर ही सेरेमनी लाईव्ह पाहता येईल. तर डिज्नी+हॉट स्टार अॅपवर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

2. कोण-कोणते सेलिब्रिटी मैदानात अवतरणार?
ऑस्कर विजेते म्यूझिक कंपोजर ए.आर. रेहमान आणि बॉलीवुड सुपरस्टार रणवीर सिंह या क्लोजिंग सेरेमनीचं मुख्य आकर्षण असणरा आहे. रेहमान आणि नीती मोहन यांचा रिहर्सल करतानाचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यामुळे नीती मोहन तसंच मोहित चौहान यांचाही परफॉरमन्स याठिकाणी असेल.  बॉलीवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील डान्स करताना दिसेल. विशेष म्हणजे सेलिब्रिटी आणि सर्व कलाकार मिळून 700 कलाकार या इव्हेंटमध्ये परफॉर्म करतील.

3. क्लोजिंग सेरेमनीची थीम काय असेल?
आयपीएल क्लोजिंग सेरेमनीची थीम ही भारताच्या 75 व्या स्वांतत्र्याचा महोत्सवाची असणार आहे. आयपीएलचं (IPL 2022) यंदाचं 15 वं वर्ष आहे. मागील 8 दशकात भारतीय क्रिकेटनं आयपीएलमुळे खूप प्रसिद्धी मिळवली आहे. 

4. गेस्ट लिस्टमध्ये कोण-कोण?

आयपीएल 2022 च्या समारोप सोहळ्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्यासह उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामन्याला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि राज्यातील काही राजकीय व्यक्ती देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील गुजरातमध्येच असल्याने ते देखील कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget