(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kohli IPL Record : 'विक्रमांचा राजा विराट', आणखी एक तगडा रेकॉर्ड केला नावावर
IPL 2022 : मुंबईच्या वानखेडे मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सला 8 विकेट्सनी मात दिली. यासोबतच विराटने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Virat Kohli in RCB vs GT : आयपीएलच्या 67 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सला (RCB vs GT) 8 गडी राखून मात दिली. या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli). गुजरातच्या 169 धावांचा पाठलाग करताना विराटने 73 धावांची तुफान खेळी केली. या खेळीसोबतच विराटने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने आयपीएलमध्ये (चॅम्पियन्स लीगमधील धावांसह) 7 हजार धावांचा टप्पा पार केला असून अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू आहे.
आयपीएलचा 15 वा हंगाम विराट कोहलीसाठी खास राहिला नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली तीन वेळा गोल्डन डकचा शिकार झाला. पण गुजरात विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटच्या नावावर आरसीबीकडून 6943 धावा (चॅम्पियन्स लीगमधील धावांसह) होत्या. त्यामुळे 57 धावा केल्यास आरसीबीकडून सात हजार धावा करणारा खेळाडू ठरणार होता. त्यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकारांसह 73 धावा करत हा विक्रम मोडत 7016 धावा नावे केल्या आहेत.
विराट कोहलीची कामगिरी -
यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नसली तरी गुजरातविरुद्ध त्याने 73 धावा ठोकत फॅन्सना खूश केलं आहेत. त्यामुळे 14 सामन्यात कोहलीच्या नावावर 309 धावा जमा झाल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीचा सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73 झाली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा (चॅम्पियन्स लीगमधील धावा सोडून)
विराट कोहली: 6592 धावा
शिखर धवन: 6205 धावा
रोहित शर्मा: 5877 धावा
डेविड वॉर्नर: 5876 धावा
सुरेश रैना: 5528 धावा
हे देखील वाचा-