![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुख खानचं होतंय कौतुक,Video
IPL 2024 Marathi News: दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने 55 धावा केल्या आणि ट्रिस्टन स्टब्सने 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली असली तरी दिल्लीचा 106 धावांनी पराभव झाला.
![DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुख खानचं होतंय कौतुक,Video DC vs KKR: Aggressive innings by Rishabh Pant; Shah Rukh Khan also stood up and praised, then met! DC vs KKR: दिल्लीच्या पंतने गोलंदाजाला धुतलं, केकेआरच्या मालकाने काय केलं?, शाहरुख खानचं होतंय कौतुक,Video](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/a00429157e4522a94db2130083ec315e1712194365041987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात काल विशाखापट्टणम येथे सामना खेळला गेला. केकेआरने प्रथम खेळताना 272 धावा केल्या. सुनील नरेन आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या अर्धशतकांव्यतिरिक्त आंद्रे रसेलच्या 41 धावांच्या तुफानी खेळीनेही कोलकाताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली होती ज्यातून त्यांना शेवटपर्यंत सावरता आले नाही. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने 55 धावा केल्या आणि ट्रिस्टन स्टब्सने 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली असली तरी दिल्लीचा 106 धावांनी पराभव झाला.
दिल्ली कॅपिटल्ससाठी डावाची सुरुवात खूपच खराब झाली. दिल्लीने पहिल्या 33 धावांत 4 महत्त्वाचे विकेट्स गमावले होते. त्यानंतर ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली, पण दिल्लीला विजयापर्यंत नेण्यासाठी ती अपुरी ठरली. पंतने 25 चेंडूत 55 धावांची तर स्टब्सने 32 चेंडूत 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यानंतर संघाने सातत्याने विकेट गमावल्या, त्यामुळे दिल्लीला 106 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
शाहरुख खानकडून ऋषभचे कौतुक-
पंतने दिल्लीच्या डावातील 12 व्या वेंकटेश अय्यरच्या बॉलिंगची पिसं काढली. वेंकटेश अय्यरच्या षटकांत 2 षटकार आणि 4 चौकार ठोकून एकूण 28 धावा केल्या आणि अर्धशतक पूर्ण केलं. पंतने 221.74 च्या स्ट्राईक रेटने 23 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 षटकारच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केलं. पंतच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 17 वं अर्धशतक ठरलं. पंतच्या या खेळीवर केकेआर संघाचे मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननेही मैदानात उभं राहून कौतुक केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
No look Pant 🫨#IPLonJioCinema #TATAIPL #DCvKKR pic.twitter.com/OLhLl28aAn
— JioCinema (@JioCinema) April 3, 2024
तसेच सामना संपल्यानंतर शाहरुख खानने ऋषभ पंतची भेटही घेतली.
An awe-inspiring moment between SRK and Rishabh Pant, reflecting their mutual respect and admiration ❤️✨#KKRvDC #Rishabpant #ShahRukhKhan pic.twitter.com/ZEnAWrE9ZK
— S A M A R 🔥 (@SRKIAN_Samar_) April 3, 2024
केकेआरची आक्रमक सुरुवात
कोलकाता नाईट रायडर्सनं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणं त्यांनी आक्रमक फलंदाजी केली. केकेआरकडून सुनील नरेन, रघुवंशी यांच्यासह आंद्रे रसेलनं 41 धावा केल्या. रिंकू सिंगनं 26 तर फिलिप सॉल्टनं आणि श्रेयस अय्यरनं 18 धावा केल्या या धावांच्या जोरावर केकेआरनं 7 विकेटवर 272 धावा केल्या.
केकेआरचा आयपीएलमधील सलग तिसरा विजय
कोलकाता नाईट रायडर्सनं ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर केकेआरनं दुसऱ्या मॅचमध्ये आरसीबीचा पराभव केला होता. आज फलदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर केकेआरच्या बॉलर्सनी दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळू दिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)