IPL 2022 : पाक पत्रकाराने मोहम्मद शामीला डिवचले, इरफान पठाणने दिलं जशास तसे उत्तर
IPL 2022 : आयपीएलमध्ये 28 मार्च रोजी गुजरात आणि लखनौ यांचा सामना झाला होता. या सामन्यात गुजरातकडून खेळणाऱ्या मोहम्मद शामीने भेदक मारा केला होता.
IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. आयपीएल स्पर्धेमुळे अनेक क्रिकेटपटूंचे क्रिकेट उजाळले आहे. आयपीएलमुळे अनेकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेय. आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाजासह विदेशी खेळाडूंनीही आपली छाप टाकली आहे. आयपीएलचा रणसंग्राम सुरु असतानाचा पाकिस्तानच्या पत्रकाराने मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पत्रकाराला माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने प्रत्युत्तर दिले आहे.
आयपीएलमध्ये 28 मार्च रोजी गुजरात आणि लखनौ यांचा सामना झाला होता. या सामन्यात गुजरातकडून खेळणाऱ्या मोहम्मद शामीने भेदक मारा केला होता. शामीच्या माऱ्यापुढे लखनौची फलंदाजी कोलमडली होती. शामीने चार षटकांत 25 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमीने पावरप्लेमध्ये अचूक टप्प्यावर मारा करत लखनौच्या फलंदाजांना धावा काढण्याची कोणतीही संधी दिली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचं सर्वच स्तरातून कौतुक होत असतानाच पाकिस्तानी पत्रकार Ihtisham Ul Haq याने ट्विट करत टीकास्त्र सोडलं.
Ihtisham Ul Haq याने ट्विट करत मोहम्मद शामीच्या पावरप्लेमधील गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने मोहम्मद शमीचे कौतुक करत सामन्यानंतर ट्विट केले होते. जागतिक क्रिकेटमध्ये मोहम्मद शामीसारखा नवीन चेंडू हाताळणारा गोलंदाज नाही, असे ट्विट इरफान पठाण याने केले होते. या ट्विटला Ihtisham Ul Haq याने रिप्लाय करत शामीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने त्याला प्रत्युत्तर दिले. Ihtisham Ul Haq इरफानच्या ट्विटला रिप्लाय करत “THEY CAN’T PLAY HIM” असे म्हटले होते. याला इरफान पठाण याने उत्तर दिले. Ihtisham Ul Haq याच्या ट्विटला इरफान पठाण याने सस्ता एक्स्पर्ट म्हणत प्रत्युत्तर दिले. तसेच 2003 वर्ल्डकपमध्ये वासिम आक्रम सचिन तेंडुलकरला बाद करु शकला नाही, त्यामुळे तो दर्जेदार गोलंदाज होऊ शकत नाही का? असा सवालही उपस्थित केला.
“THEY CAN’T PLAY HIM” https://t.co/5v7DplJCY1
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) March 31, 2022
ट्विटरवर इरफान पठाण आणि Ihtisham Ul Haq यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. दोघांमध्ये ट्विटरवॉर सुरु होतं. यामध्ये चाहत्यांनही उडी घेतली. त्यामुळे ट्विटरवर भारत आणि पाकिस्तान असा माहोल झाला होता. अनेकांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील जुन्या सामन्याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आपलं मत व्यक्त केले.