एक्स्प्लोर

IPL Auction 2024 : IPL लिलावात जगातील नंबर वन T-20 बॉलरला काडीची किंमत नाही! फक्त 1 दिवसाने केला कोट्यवधींचा घात

IPL Auction 2024 : जर आदिल रशीद एक दिवस अगोदर आयसीसी क्रमवारीत नंबर-1 टी-20 गोलंदाज बनला असता, तर कदाचित त्याला 5-7 कोटी रुपयांना खरेदी करता आले असते.

IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये आयोजित करण्यात आला. या लिलावात आयपीएलच्या सर्व दहा संघांनी मिळून एकूण 230 कोटी रुपये खर्च केले आणि 72 खेळाडूंना आपापल्या संघात समाविष्ट केले. या काळात अनेक खेळाडूंच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या, मात्र अनेक जागतिक दर्जाच्या खेळाडूंच्या नावावर एकही बोली लागली नाही.

नंबर-1 टी-20 गोलंदाजाला काडीची किंमत नाही 

जगातील सर्वात मोठ्या T20 लीगच्या लिलावात जगातील नंबर-1 टी-20 गोलंदाज आदिल रशीद विकला गेला नाही. इंग्लंडचा दिग्गज फिरकी गोलंदाज आदिल रशीद, ज्याने आयपीएल 2024 च्या लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत नाव नोंदवले होते. 19 डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात, आदिल रशीदला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवले नाही, त्यामुळे तो विकला गेला नाही आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 डिसेंबर रोजी आदिल रशीद आयसीसी क्रमवारीत जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाज ठरला.

आदिल रशीदने अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खान आणि भारताचा युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांना मागे टाकून नंबर-1 स्थान मिळवले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमध्ये तो जगातील नंबर-1 गोलंदाज ठरला. सध्या ICC T20 गोलंदाजांच्या क्रमवारीत आदिल रशीदचे सर्वाधिक 715 गुण आहेत, त्याच्यानंतर रशीद खान क्रमांक 2 वर आहे, ज्याचे 692 गुण आहेत. या दोघांनंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताच्या रवी बिश्नोईचे नाव आहे, ज्यांचे 685 गुण आहेत.

आयसीसी मानांकन असलेल्या खेळाडूंचा लिलाव

मात्र, जर आदिल रशीद एक दिवस अगोदर आयसीसी क्रमवारीत नंबर-1 टी-20 गोलंदाज बनला असता, तर कदाचित त्याला 5-7 कोटी रुपयांना खरेदी करता आले असते. मात्र, आयपीएल लिलावात आयसीसी क्रमवारी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा प्रभाव पडत नाही. कारण श्रीलंकेचा फिरकी अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा देखील ICC T20 गोलंदाजांच्या क्रमवारीत क्रमांक 4 वर आहे, परंतु कोणत्याही संघाने त्याच्या नावावर बोली लावली नाही. शेवटी, सनरायझर्स हैदराबादने त्याला त्याच्या मूळ किंमत 1.50 कोटींना खरेदी केले.

अशीच परिस्थिती ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची झाली. स्टीव्ह स्मिथ आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याला आयपीएलचाही भरपूर अनुभव आहे. त्याने अनेक हंगामात कर्णधारपदही भूषवले आहे, पण तरीही त्याला खरेदीदार मिळाला नाही. दक्षिण आफ्रिकेचा रासी हा देखील वनडे क्रमवारीत 8 क्रमांकाचा फलंदाज आहे, परंतु तो देखील आयपीएल 2024 च्या लिलावात विकला गेला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget