Video : केकेआरचा युवा खेळाडू रिंकूचा फॅन झाला आमिर खान, म्हणाला...
IPL 2022 : केकेआरचा संघ आयपीएलमधून बाहेर गेला असला तरी लखनौविरुद्ध केकेआरच्या रिंकूने केलेल्या दमदार 15 चेंडूतील 40 धावांच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचे अंतिम चार संघ आता समोर आले आहे. गुजरात, राजस्थान, लखनौ आणि बंगळुरु हे संघ प्लेऑफमध्ये गेले आहे. तर इतर 6 संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत. यातील एक संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स अर्था केकेआर (KKR). केकेआरच्या संघाने यंदा खास कामगिरी केलेली नाही, पण त्यांचा एक युवा खेळाडू यंदा चांगलाच चमकला. हा खेळाडू म्हणजे युवा फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh). रिंकूने यंदा त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे सर्वांचीच मनं जिंकली. त्याने लखनौ सुपरजायंट्स संघाविरुद्ध केलेल्या 15 चेंडूतील 40 धावांच्या फटकेबाजीची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्ट अर्थात आमिर खान (Aamir Khan) हा देखील रिंकूच्या फलंदाजीचा फॅन झाला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये रिंकू सिंहने 7 सामन्यात 34.80 च्या सरासरीने आणि 148.71 च्या स्ट्राईक रेटने 174 रन केले. यामध्ये नाबाद 42 ही त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. रिंकूने यंदा 17 चौकार आणि 7 षटकार ठोकले. आमिर खान याने देखील रिंकूच्या फलंदाजीचं कौतुक केलं. तो म्हणाला, 'रिंकूने शानदार खेळ दाखवला. त्याने एकट्याच्या जीवावर सामना जवळपास जिंकवला होता. पण दुर्देवाने त्यांचा थोडक्यात पराभव झाला. रिंकूने केकेआरला विजय मिळवून दिलाच होता, पण ठिक आहे विजय-पराभव खेळाचा भाग आहे.'
विशेष म्हणजे रिंकूने देखील आमिर खानचं धन्यवाद करत त्याला रिप्लाय दिला आहे. रिंकू म्हणाला,''थँक्यू. तुम्हाला माझी बॅटिंग आवडली, हे ऐकून मन आनंदी झालं.''
रिंकूची कारकिर्द
उत्तर प्रदेशच्या अलीगडचा असणाऱ्या रिंकू सिंहने आतापर्यंत 30 प्रथम श्रेणी सामन्यात 2 हजार 307 रन केले आहेत. यामध्ये त्याने 5 शतकं आणि 16 अर्धशतकं ठोकली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटम्ये त्याची सरासरी 64.08 असून नाबाद 163 ही त्याची सर्वश्रेष्ठ धावसंख्या आहे. याशिवाय रिंकूने 41 लिस्ट ए सामने खेळले असून त्यात 51 च्या सरासरीने त्याने 1414 रन बनवले आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 शतक आणि 12 अर्धशतकं आहेत. त्याने 62 टी20 सामन्यात 5 अर्धशतक करत 1016 रन बनवले आहेत. यंदाच्या महालिलावात केकेआरने रिंकूला 55 लाख रुपयांना खरेदी केलं.
हे ही वाचा -