IPL Mega Auction 2022 : आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया जोरात; भारतीय संघातील खेळाडू मात्र तणावात!
IPL Mega Auction 2022 today LIVE : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सुरु आहे. ऑक्शन दरम्यान भारतीय संघातील खेळाडू मात्र तणावात दिसून आले.
IPL Mega Auction 2022 today LIVE : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सुरु आहे. काल पहिल्या दिवशी दहा संघांनी 74 खेळाडूंवर 388 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली. 74 खेळाडूंमध्ये 54 भारतीय आणि 20 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दिल्ली संघाने सर्वाधिक खेळाडूंना खरेदी केलं. पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू खेळाडू ठरला. मात्र या हंगामासाठी पहिल्या दिवशी काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.
ऑक्शन दरम्यान भारतीय संघातील खेळाडू मात्र तणावात दिसून आले. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)नं आपल्या इन्स्टा स्टोरीला ऑक्शनच्या वेळेचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो सर्व खेळाडू मन लावून ऑक्शन पाहत असल्याचं दिसत आहे. यात काही खेळाडू आनंदात तर काही तणावात दिसून येत आहेत. रोहितनं शेअर केलेल्या या फोटोवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. फोटो शेअर करताना रोहितनं Some Tensed and Some happy faces असं कॅप्शन लिहिलं आहे.
मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेला सुरेश रैना, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ, बांग्लादेशचा स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन आणि दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज खेळाडू डेविड मिलर यांना कुणीही खरेदीदार काल मिळाला नाही. आज या दिग्गज खेळाडूंसह अन्य काही खेळाडूंच्या लिलावाकडेही लक्ष लागून आहे.
आवेश खान सर्वात महागडा अनकॅप खेळाडू
मुंबई इंडियन्सने ईशानला 15.25 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. तर आवेश खान सर्वात महागडा अनकॅप खेळाडू राहिला. लखनौ संघाने आवेश खानला 10 कोटी रुपयांत खरेदी केलं. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला आहे.
संबंधित बातम्या :
- IPL 2022 Auction Live : आयपीएल 2022 च्या रणसंग्रामासाठी लिलाव प्रक्रिया, पाहा प्रत्येक अपडेट्स
- IPL Auction Live Streaming: आयपीएल मेगा ऑक्शन 2022 लाईव्ह कधी, कुठे आणि कसं पाहायचं?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha