एक्स्प्लोर

IPL Auction 2019 : कधी, कुठे, केव्हा; IPL लिलावाची प्रत्येक अपडेट

IPL Auction 2019 : सुरुवातीला एकूण 1003 खेळाडूंनी लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 346 खेळाडूंची निवड करण्यात आली. आणखी चार नावं शेवटी जोडल्याने खेळाडूंची संख्या 350 झाली आहे.

जयपूर : इंडियन प्रीमियर लीग 2019 साठी खेळाडूंचा आज (18 डिसेंबर) लिलाव होणार आहे. आयपीएलच्या 12 सीझनच्या या लिलावात एकूण 350 क्रिकेटरचा समावेश असून त्यात 228 भारतीय आणि 133 परदेशी आहेत. जयपूरमध्ये आज या खेळाडूंवर आयपीएलच्या 8 फ्रॅन्चायजी बोली लावतील. एका वर्षात दुसरा लिलाव आयपीएलसाठी यंदाच्या वर्षातील हा दुसरा लिलाव आहे. याआधी जानेवारीमध्ये 2018 साठी खेळाडूंचा लिलाव झाला होता. आयपीएलसाठी लिलाव जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होतो. पण पुढच्या वर्षी होणारा वन डे विश्वचषक आणि भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल मार्च महिन्यातच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्रेन्चायझींना तयारी करण्यासाठी कमी वेळ मिळेल. त्यासाठी लिलाव लवकर केला जात आहे. सुरुवातीला एकूण 1003 खेळाडूंनी लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 346 खेळाडूंची निवड करण्यात आली. आणखी चार नावं शेवटी जोडल्याने खेळाडूंची संख्या 350 झाली आहे. इंग्लंडचा इयान मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा रिली मेरेडिथी, आणखी दोन अनकॅप्ड भारतीयांमध्ये मयांक डागर आणि प्रणव गुप्ता यांचा यादीत नंतर समावेश करण्यात आला. या लिलावात 119 कॅप्ड, 229 अनकॅप्ड आणि 2 असोसिएट नेशनच्या खेळाडूंवर बोली लागेल. रिचर्ड यांच्या जागी अॅडमिडेस नव्या शहरात लिलावासह यंदा नवे संचालकही दिसतील. आयपीएल लिलावाचं नियमित स्वरुपात संचालन करणारे रिचर्ड मेडले यंदा आयपीएलचा भाग नसतील. त्यामुळे लिलावाची जबबादारी ह्यू अॅडमिडेस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूची बेस प्राईज दोन कोटी नाही! या लिलावात कोणत्याही भारतीय खेळाडूने त्याची बेस प्राईज दोन कोटी ठेवलेली नाही. दो कोटींच्या बेस प्राईजवर यंदा सर्वच (9) परदेशी खेळाडू उपलब्ध आहेत. शेवटच्या क्षणी मॉर्गन सामील झाल्याने ही संख्या 10 झाली आहे. यामध्ये इंग्लंडचा सॅम कुर्रन, ख्रिस वोक्स, दक्षिण अफ्रिकेचा कॉलिन इंग्राम, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज आणि लसिथ मलिंगा, ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आणि डार्सी शॉट, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम आणि कोरी अँडरसन यांचा समावेश आहे. काय, कधी कुठे? काय : आयपीएल 2019 लिलाव कधी : 18 डिसेंबर, 2018 कुठे : जयपूर केव्हा : दुपारी 3 वाजता (भारतीय वेळेनुसार) कोणत्या संघाकडे किती पैसा? कोलकाता नाईट रायडर्स - (12 खेळाडूंची जागा रिकामी - 7 भारतीय, 5 परदेशी) - 15.20 कोटी किंग्ज इलेव्हन पंजाब - (15 खेळांडूची जागा रिकामी - 11 भारतीय, 4 परदेशी) - 36.20 कोटी दिल्ली कॅपिटल्स - (10 खेळाडूंची जागा रिकामी- 7 भारतीय, 3 परदेशी) - 25.50 कोटी रॉयल चॅलेंजर बंगलोर - (10 खेळाडूंची जागा रिकामी - 8 भारतीय, 2 परदेशी) - 18.15 कोटी मुंबई इंडियन्स - (7 खेळाडूंची जागा रिकामी - 6 भारतीय, 1 परदेशी) - 11.15 कोटी राजस्थान रॉयल्स - (9 खेळाडूंची जागा रिकामी - 6 भारतीय, 3 परदेशी) - 20.95 कोटी चेन्नई सुपर किंग्ज - (2 खेळाडूंची जागा रिकामी- 2 भारतीय, 0 परदेशी) - 8.40 कोटी सनरायझर्स हैदराबाद - (5 खेळाडूंची जागा रिकामी- 3 भारतीय, 2 परदेशी) - 9.70 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MIDC Gas Leakage: अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत वायूगळती, संपूर्ण शहरात धुराचं साम्राज्य
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli :  निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने  जर शिक्षा दिली तर...''
निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Embed widget