एक्स्प्लोर

IPL 2021, RCB Team: विराटच्या 'आरसीबी'ला मोठा धक्का, 'या' धडाकेबाज खेळाडूला कोरोनाची लागण

IPL 2021, RCB Team:आयपीएलमधील पहिला सामना विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे. या सामन्याआधी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. कारण  आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिकलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

IPL 2021, RCB Team: इंडियन प्रीमियर लीगचं 14 वं पर्व 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे. आयपीएलमधील पहिला सामना विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे. या सामन्याआधी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. कारण आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिकलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल दिल्लीला स्टार ऑलराउंडर अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळं धक्का बसला होता.  हे दोन्ही खेळाडू सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. 

मागील सीझनमध्ये देवदत्तची कामगिरी शानदार
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या 20 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पडिकलनं मागील पर्वातच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएल 2020 त्याच्यासाठी जोरदार राहिलं. त्यानं या पर्वात विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा केल्या होत्या. 15 सामन्यात त्यानं 473 धावा केल्या होत्या ज्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश होता.  

IPL 2021 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, ऑलराऊंडर अक्षर पटेल कोरोना पॉझिटीव्ह

आयपीएल 2021 वर कोरोनाचं दुष्टचक्र 
आयपीएल 2021 सुरु होण्यासाठी केवळ पाच दिवस बाकी आहेत. अशात आरसीबीचा देवदत्त पडिकल आणि दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांना कोरोनोची लागण झालीय. तर चेन्नई सुपर किंग्सचा एक सदस्य देखील कोरोनाबाधित झाला आहे. तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे एकूण 10 कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधित झाल्याची माहिती आहे. 

IPL 2021 Viral Video | राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू रुमचा कॅमेरा बंद करायला विसरला अन्...

यंदाच्या हंगामात दोन संघांचे कर्णधार बदलले

दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दोन संघांचे कर्णधार बदलण्यात आले आहेत. तर सहा संघांच्या कर्णधारांनी मागील हंगामातही संघाचं नेतृत्व केलं होतं. राजस्थान रॉयल्सने यावेळी संजू सॅमसनला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने संघांचं नेतृत्व केलं होतं. मात्र यावर्षी त्याला संघाने रिलीज केलं आहे.  त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Embed widget