एक्स्प्लोर

MS Dhoni : धोनीची परफेक्ट स्ट्रॅटेजी अन किशनचा बळी; काय घडलं मैदानावर नक्की वाचा..

मुंबई इंडियन्स या सामन्यामधून जोरदार कमबॅक करत असताना, महेंद्रसिंह धोनीने ऐनवेळी असा डाव टाकला की सहज जिंकू अशा अविर्भावात असणाऱ्या मुंबई इंडियन्स ला पराभवाला सामोरे जावं लागलं.

महेंद्रसिंह धोनी (M S Dhoni)  आपल्या मैदानातील वेगवेगळ्या डावपेचांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघ हरतोय असं वाटत असताना शेवटच्या क्षणी सामना फिरवण्याची किमया त्याने अनेकदा केली आहे. याची प्रचिती रविवार झालेल्या आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK vs MI) या सामन्यांमध्ये देखील आली.  मुंबई इंडियन्स या सामन्यामधून जोरदार कमबॅक करत असताना, महेंद्रसिंह धोनीने ऐनवेळी असा डाव टाकला की सहज जिंकू अशा अविर्भावात असणाऱ्या मुंबई इंडियन्स ला पराभवाला सामोरे जावं लागलं.

ईशान किशन आणि सौरभ तिवारी मैदानावर असताना धोनीने मीडियम पेसर असलेल्या शार्दुल ठाकुर, ब्रावो आणि मोईन अली यांच्याकडे चेंडू सोपवला. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना मोठे शॉट्स लावणे अवघड होऊन बसले. स्ट्रॅटेजिक टाईम आऊट व्हायच्या आधी शेवटच्या चेंडूवर कव्हर रीजनल एक फिल्डर होता. स्ट्रॅटेजिक टाईम आऊट नंतर धोनीने ईशान किशनला तंबूत धाडण्याचे पूर्ण नियोजन केले आणि ब्रावोकडे चेंडू सोपवला. स्लो असलेल्या पीचचा अंदाज घेऊन धोनीने सांगितल्याप्रमाणे ब्राव्होने स्लो बॉल टाकला. त्याआधी शॉर्ट कव्हरला एक फिल्डर आणला होता. ब्राव्होच्या स्लो चेंडूवर ईशान किशन कितपत जोराचा टोला हाणू शकतो याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी सुरेश रैनाला उभं केलं होतं. आणि झालेही तसेच. ब्राव्होच्या चेंडूवर ईशान किशनने टोला लगावला तो थेट सुरेश रैनाच्या हातात गेला. हा सीन पाहिल्यानंतर धोनीला परफेक्ट स्ट्रॅटेजिस्ट आणि मिस्टर कूल का म्हणतात याचा अंदाज येतो. 

एम एस धोनी (M S Dhoni) यांची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीने टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक यशाचे टप्पे गाठले. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने टी 20 आणि वन डे वर्ल्डकप जिंकले आहे. आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.

चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत सहा गडी बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ निर्धारित षटकांत केवळ 136 धावा करू शकला. आयपीएल 2021 मध्ये चेन्नईचा हा सहावा विजय आहे. आता त्यांचे आठ सामन्यात 12 गुण आहेत. या विजयासह चेन्नईने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध 218 धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने हारला विजयात बदललं होतं. मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray PC : फक्त याद्यांमध्ये गोंधळ नाही तर अनेक ठिकाणी घोळ, आदित्य ठाकरेंचा आरोप
Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
Embed widget