CSK vs SRH, Innings Highlights: चेन्नईचा हैदराबादवर शानदार विजय, गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप
CSK vs SRH, Innings Highlights : दिल्लीमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नईनं हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह धोनी ब्रिगेडने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. विजयासाठी हैदराबादनं ठेवललं 172 धावाचं लक्ष्य गाठताना चेन्नईनं तीन गडी गमावले तसंच 19 व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केलं.
CSK vs SRH, Innings Highlights : दिल्लीमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नईनं हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह धोनी ब्रिगेडने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. विजयासाठी हैदराबादनं ठेवललं 172 धावाचं लक्ष्य गाठताना चेन्नईनं तीन गडी गमावले तसंच 19 व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केलं. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरांनी जबरदस्त कामगिरी केली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 129 धावा जोडल्या.
ऋतुराज गायकवाडनं 12 चौकारांच्या मदतीनं 44 चेंडूत 75 धावांची खेळी केली. त्याला राशिद खाननं बाद केलं. यानंतर फाफनं 38 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्यानंतर टाकलेल्या राशीद खाननं मोईन अली आणि फाफला लागोपाठ बाद केलं. यानंतर मात्र रविंद्र जाडेजा (7) आणि सुरेश रैनानं (17) कुठलीही पडझड न होऊ देता संघाला सात विकेट्सनं विजय मिळवून दिला.
त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं चेन्नईसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं. डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडेंच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादनं आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे. डेविड वॉर्नरनं 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 55 चेंडूत 57 धावा केल्या. तर मनिष पांडेनं 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 46 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागिदारी केली. वॉर्नर आणि पांडे बाद झाल्यानंतर विलियमसननं 10 चेंडूत 26 धावांची खेळी करत संघाला सुस्थितीत नेले होेते.
आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा मान डेविड वॉर्नरच्या नावावर आहे त्यानं आज चेन्नई विरोधात अर्धशतक झळकावून त्याने स्पर्धेतील 50 वं अर्धशतक साजरं केलं आहे. शेवटी विलियमसन आणि केदार जाधवनं चांगली फटकेबाजी करत संघाला 171 धावांचा टप्पा गाठून दिला.