IPL 2020, SRHvsDC : हैदराबादकडून दिल्लीचा 88 धावांनी पराभव, हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान कायम
रशीद खानच्या फिरकीसमोर दिल्लीचे खेळाडू टिकू शकले नाहीत. रशीद खानने 4 षटकांत 7 धावा देत 3 विकेट घेतल्या.
IPL 2020, SRHvsDC : आयपीएलच्या 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी विजय मिळवला. रिद्धीमान साहा, रशीद खान आणि डेविड वॉर्नर हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले. हैदराबादने धावांचा डोंगर उभारत दिल्ली समोर 220 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने संघ अवघ्या 131 धावांवर गारद झाला. या विजयासर हैदराबाद पॉईंट टेबलमध्ये सहाव्या नंबर पोहोचली आहे.
रशीद खानच्या फिरकीसमोर दिल्लीचे खेळाडू टिकू शकले नाहीत. रशीद खानने 4 षटकांत 7 धावा देत 3 विकेट घेतल्या. दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 26, शिमरॉन हेटमायरने 16, तुषार देसपांडेने धावा केल्या. दिल्लीचे इतर खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. हैदराबादकडून रशीद खानने 3, संदीप शर्मा आणि नजराजनने 2 तर शाहबाज नदीम, जेसन होल्डर आणि विजय शंकरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी टॉस जिंकून प्रथन फलंदाजीला आलेल्या हैदराबादची सुरुवात दमदार झाली. डेव्हिड वॉर्नर आणि रिद्धिमान साहाने पहिल्या विकेटसाठी 9.4 षटकांत 107 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने 34 चेंडूत 66 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर साहाने मनीष पांडेसमवेत दुसर्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. साहाने 45 चेंडूत 87 धावा केल्या. या खेळीत साहाने 12 चौकार आणि 2 षटकार लगावले.
170 धावांत दोन विकेट गेल्यानंतर मनीष पांडे आणि केन विल्यमसन यांनी 49 धावांची नाबाद भागीदारी केली. पांडेने 31 चेंडूंत नाबाद 44 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या फलंदाजीमधून चार चौकार आणि एक षटकार बाहेर आला. विल्यमसन 10 चेंडूत 11 धावा करून नाबाद राहिला. दिल्लीकडून आर अश्विन आणि एनरिक नॉर्टजे प्रत्येकी एक विकेट घेतली.