एक्स्प्लोर

RCB vs KXIP : किंग्ज इलेव्हन पंजाबकडून बंगळुरूचा 8 गडी राखून पराभव; केएल राहुल, ख्रिस गेलचं अर्धशतक

RCB vs KXIP IPL 2020 : किंग्ज इलेव्हन पंजाबने शारजा मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 गडी राखून पराभव केला. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला 172 धावांचे लक्ष्य दिले, प्रत्त्युत्तरादाखल पंजाबने शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. या मोसमातील पंजाबचा हा दुसरा विजय आहे. ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी अर्धशतकांचा डाव खेळला.

RCB vs KXIP IPL 2020 : रोमांचक सामान्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा आठ गडी राखून पराभव केला. 172 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात दमदार झाली. मात्र, तरीही त्यांना अखेरच्या षटकात विजयासाठी झगडावे लागले. कर्णधार के एल राहुल आणि ख्रिस गेल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने दिलेलं 172 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबने आज दमदार सुरुवात केली. कर्णधार के एल राहुलने आपला फॉर्म कायम ठेवत शानदार अर्धशतक झळकावले. राहुलने 49 चेंडूत एक चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 61 केल्या. तर त्याच्या सोबत सलामीला आलेल्या मयांक अगरवालने 25 चेंडूत चार चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 45 धावा जमवल्या. त्यानंतर आलेल्या ख्रिस गेलने देखील 45 चेंडूत एक चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी उचलली. इतकी चांगली बॅटींग करुनही विजयासाठी पंजाबला अखेरच्या षटकात झगडावे लागले. निकोलस पुरनने एक चेंडूत एक धाव लागत असताना विजयी षटकार मारत पंजाबला या मोसमातील पहिला विजय मिळवून दिला.

गूगलचा घोळ : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा झाली या प्रसिद्ध खेळाडूची पत्नी

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून RCB चा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात देखील चांगली झाली. मात्र, त्यानंतर आरसीबीचा एक-एक फलंदाज ठराविक अंतराने तंबूत परतले. देवदत पडिक्कल आणि फिंच या सलामीच्या जोडीने आरसीबीच्या संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांनी 38 धावांची भागीदारी केली. बाद झाल्यानंतर फिंच आणि कर्णधार कोहली यांच्यातही छोटेखानी भागीदारी झाली.

मात्र, आश्विनने फिंचचा त्रिफळा उडवत आरसीबीला आणखी एक धक्का दिला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला देखील लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. एबी डिव्हीलियर्स देखील स्वस्तात माघारी परतला. शिवम दुबेने मैदानावर येऊन विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरला. संघाचा एकएक शिलेदार माघारी परतत असताना विराटने एक बाजू लावून धरला. विराटने सर्वाधिक 39 चेंडूत तीन चौकाराच्या मदतीने सर्वाधिक 48 धावा काढल्या. अखेरच्या षटकात ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत आरसीबीला 171 धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि मुरगन आश्विनने प्रत्येकी 2 तर अर्शदीप सिंह आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget