DC vs SRH IPL 2020: सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव करत दिल्ली कॅपिटल्सची फायनलमध्ये धडक
सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव करत दिल्ली कॅपिटल्सची फायनलमध्ये धडक मारली आहे.मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये फायनलाचा सामना रंगणार आहे.
DC vs SRH Qualifier 2 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाचं फायनलमध्ये धडक मारली आहे. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात 189 धावांचे लक्ष्य उभारले होते. प्रत्त्युतरात सनरायझर्स हैदराबादचा संघ 172 धावापर्यंतचं मजल मारु शकला.
दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं 190 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरुवात अत्यंत वाईट झाली. सलामीची जोडी प्रियम गर्ग आणि कर्णधार डेविड वॉर्नर स्वस्तात परतले. मनिष पांडेही 21 धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या केन विलियमसनने मात्र धुवांधार बॅटींग केली. त्याला काही काळ जेसन होल्डरने साथ दिली. मात्र, तोही 11 धावांवर तंबूत परतला. नंतर आलेल्या अब्दुल समदने मात्र विलियमसनला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. विजय समीप येत असतानचं विलियमसनची विकेट पडली. त्याने 45 चेंडूत 67 धावा केल्या. यात पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. विलियमसन बाद झाल्यानंतरही अब्दुलने विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. मात्र, तोही मोठे फटके मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 33 धावा जमवल्या. राशिद खानने काही फटके मारले पण तोही झेलबाद झाला. त्याने 11 धावा काढल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर मार्कस स्टोनिस आणि शिखर धवनने चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 8.२ षटकांत 86 धावांची भर घातली. स्टोनिस 27 चेंडूत 38 धावांवर बाद झाला. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला.
यानंतर तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने 20 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने धवनबरोबर दुसर्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. अय्यरच्या बाद झाल्यानंतर शिमरन हेटमायर फलंदाजीला आला आणि हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडले.
हेटमायर आणि धवन यांनी 52 धावांची भागीदारी केली. 50 चेंडूत 78 धावा करून धवन पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याचवेळी हेटमायर 22 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिला. त्याच्या खेळीत हेटमीयरने चार चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचा स्ट्राइक रेट 190.91 होता.
दुसरीकडे, जेसन होल्डर आज सनरायझर्स हैदराबादसाठी खूप महागडा ठरला. त्याने त्याच्या चार षटकांत 50 धावांत एक गडी बाद केला. राशिद खानने अत्यंत माफक गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 26 धावा देऊन एक बळी घेतला. याशिवाय संदीप शर्मालाही एक यश मिळालं.