एक्स्प्लोर

IPL 2020: अजित आगरकरने निवडली त्यांची 'बेस्ट प्लेईंग 11'; विराट, रोहित, राहुलला स्थान नाही

आगरकरने शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरला आपल्या संघात सलामीवीर म्हणून निवडले आहे. याशिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलियर्स यांनाही त्यांच्या संघात स्थान दिलं आहे.

IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा सीजन संपुष्टात आला आहे. आता आयपीएल 2020 मधील कामगिरीच्या जोरावर माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञ त्यांचा सर्वोत्कृष्ट संघ निवडत आहेत. दरम्यान, माजी भारतीय स्टार गोलंदाज अजित आगरकरने 'स्टार स्पोर्ट्स' वर बेस्ट प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे, ज्यात त्याने 'ऑरेंज कॅप' विजेता केएल राहुलसह अनेक बड्या भारतीय खेळाडुंना स्थान दिलं नाही.

आगरकरच्या संघात राहुल, रोहित आणि कोहलीला स्थान नाही

यावर्षीच्या आयपीएल 2020 च्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये अजित आगरकरने केएल राहुल, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माचा समावेश केलेला नाही. याशिवाय त्याने आंद्रे रसेलचा देखील आपल्या संघात स्थान दिलेलं नाही. आगरकरने त्याच्या संघात पाच फलंदाज, दोन अष्टपैलू, दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने फिरकी गोलंदाजीत स्पर्धेत सर्वात किफायतशीर असलेल्या राशिद खानचीही निवड केलेली नाही.

आगरकरने शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरला आपल्या संघात सलामीवीर म्हणून निवडले आहे. याशिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलियर्स यांनाही त्यांच्या संघात स्थान दिलं आहे. त्याचबरोबर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचीही आपल्या संघात निवड केली आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडाचा संघात समावेश केला आहे. रबाडाने स्पर्धेत सर्वाधिक विकेट्ससह पर्पल कॅप मिळवली होती. बुमराह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू होता.

अजित आगरकरची बेस्ट प्लेईंग इलेव्हन

डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, एबी डिव्हिलियर्स, हार्दिक पांड्या, मार्कस स्टॉयनिस, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : ...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
Donald Trump : संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धडकी भरवणाऱ्या वक्तव्यानं खळबळ
संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Gitte : महादेव गित्तेसह 4 आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची माहितीMahadev Gitte : महादेव गित्तेला हर्सूल जेलमध्ये पाठवलं, म्हणाला, वाल्मिकनेच आम्हाला मारलंABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 31 March 2025 संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सMaharashtra News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : ...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
...अन्यथा, मला आग लावावी लागेल; नाना पटोले संतापले, पीडित कुटुंबाचे सांत्वन करून थेट इशारा
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
तुम्ही राजघराण्यात जन्माला आला आहात, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा; बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेंची मागणी
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
Donald Trump : संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धडकी भरवणाऱ्या वक्तव्यानं खळबळ
संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ
Stock Market : तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
तीन महिन्यात 299 टक्के परतावा, नवख्या स्टॉकची कमाल, 85 रुपयांचा स्टॉक आता किती रुपयांवर?
Weather Today: पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Embed widget