एक्स्प्लोर

IPL 2020, DCvsCSK : दिल्लीची चेन्नईवर 5 विकेट्सनी मात, शिखर धवनची शतकी खेळी

शिखर धवन दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर दिल्लीचा विजय सोपा झाला.

IPL 2020, DCvsCSK : दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्सवर 5 विकेट्सनी मात केली आहे. शिखर धवन दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर दिल्लीचा विजय सोपा झाला. चेन्नईने पहिली फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 179 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने एक चेंडू राखून विजय मिळवला. चेन्नईवरील या विजयामुळे दिल्लीनं 14 गुणांसह गुणतालिकेत आपली जागा आणखी मजबूत केली आहे.

दिल्लीची चेन्नईच्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ खाते न उघडताच तंबूत परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही पाचव्या षटकात केवळ 8 धावा करून बाद झाला. यानंतर शिखर धवनने चेन्नईच्या गोलंदाजांवर एकीकडून हल्ला सुरु ठेवला. दुसर्‍या विकेटसाठी त्याने श्रेयस अय्यरबरोबर महत्त्वपूर्ण 68 धावांची भागीदारी केली. मात्र अय्यर ब्राव्होच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात 23 धावांवर बाद झाला. यानंतर मार्कस स्टॉयनिसने आक्रमक पद्धतीने 14 चेंडूत 24 धावा केल्या. स्टॉयनिस बाद झाल्यानंतर एकवेळ दिल्लीने सामना हातातून गमावला असं वाटत होतं. मात्र अक्षर पटेलने 5 चेंडूत केलेल्या 21 धावा निर्णायक ठरल्या. अक्षर पटेलने त्यांच्या खेळी 3 षटकार लगावले.

शिखर धवनचं आयपीएलमधील पहिलं शतक

शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यात त्याने 14 चौकार आणि एक षटकार खेचला. धवनचं आयपीएलमधील हे पहिलं शतक ठरलं. यंदाच्या मोसमात लोकेश राहुल, मयांक अगरवाल यांच्यानंतर शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. दीपक चहरने चेन्नईकडून उत्कृष्ट गोलंदाजी करत चार षटकांत केवळ 18 धावा देऊन दोन बळी घेतले. सॅम कुरन, शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

त्याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र चेन्नईची सुरुवात खराब झाली. तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात सॅम करनला माघारी धाडलं. त्यानंतर फाफ डु-प्लेसिस आणि शेन वॉटसनने चेन्नईचा डाव सावरला. डु प्लेसिसने 47 चेंडूत 58 धावा केल्या. तर शेन वॉटसनने 36 धावा केल्या. अंबाती रायुडूने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत 25 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. रविंद्र जाडेजानेही त्याला उत्तम साथ दिली. रविंद्र जाडेजाने 13 चेंडूत 33 धावा केल्या. दिल्लीकडून ऑनरिज नॉर्जने 2 तर तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget