एक्स्प्लोर
अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून किंग्ज इलेव्हन पंजाबचा धुव्वा, लोकेश राहुलचे शतक व्यर्थ
अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा तीन गडी राखून पराभव केला आहे.

मुंबई : अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा तीन गडी राखून पराभव केला. पंजाबने दिलेले 198 धावांचे आव्हान मुंबईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. मुंबईचा कर्णधार केरॉन पोलार्ड आजच्या सामन्याचा शिल्पकार ठरला. पोलार्डने 31 चेंडूत 10 षटकार आणि 3 चौकारांच्या सहाय्याने 83 धावांची तुफानी खेळी केली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. सलामीवर ख्रिस गेल आणि के.एल. राहुल या दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. गेलने 36 चेंडूत सात षटकार आणि तीन चौकारांच्या सहाय्याने 63 धावा केल्या. तर राहुलने 64 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने 100 धावांची खेळी केले. गेल आणि राहुलनंतर पंजाबच्या कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. मुंबईकडून हार्दिक पंड्याने चार षटकात 57 धावा देत 2 बळी घेतले.
.@mipaltan beat KXIP by 3 wickets on the last ball!
Phew, what a thrilling game we've witnessed ???? #MIvKXIP pic.twitter.com/Uu5UjXknPr — IndianPremierLeague (@IPL) April 10, 2019
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























