एक्स्प्लोर

Sania Mirza : 22 वर्षांचा प्रवास... 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, सानियाच्या चमकदार कारकिर्दीवर एक नजर

Sania Mirza Career :भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आज (27 जानेवारी) आपल्या कारकिर्दीतील शेवटचा ग्रँड स्लॅम सामना खेळला. तिची 22 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अखेर संपली असून काही दिवसांपूर्वी तिने निवृत्ती जाहीर केली होती.

Sania Mirza Retirement : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या (Australian Open 2023) मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि रोहन बोपण्णा जोडीचा 6-7 (2), 2-6 असा पराभव झाला. सानिया मिर्झाच्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. अलीकडेच तिने एका भावूक सोशल मीडिया पोस्टमधून निवृत्ती जाहीर केली होती. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन तिची अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. ज्यात तिने फायनलपर्यंत धडक घेतली, पण अखेरच्या सामन्यात पराभव झाल्यानं अखेरच्या स्पर्धेत ग्रँडस्लॅम जिंकण्याचं तिचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. दरम्यान 36 वर्षीय सानियाने वयाच्या 18 व्या वर्षी पहिला ग्रँडस्लॅम सामना खेळला होता. 2001 मध्ये तिने भारताच्या ITF टूर्नामेंटने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर पुढची 22 वर्षे तिने टेनिस जगतात बरचं यश मिळवलं. तिच्या याच प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...

भारतातील सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू

सानिया मिर्झाने तिचे पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या माध्यमातून खेळली होती. पदार्पणाच्या सामन्यात तिने विजय मिळवला. या ग्रँडस्लॅममध्ये तिने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. यानंतर, यूएस ओपन 2005 मध्ये तिने महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. 2005 मध्येच सानियाने पहिले एकेरी WTA टूर विजेतेपद पटकावले. तसेच ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्याच वर्षी तिला टॉप-50 क्रमवारीत स्थान मिळवण्यात यश आले. तिची WTA न्यूकमर ऑफ द इयर देखील निवड झाली. याआधी टेनिस विश्वात कोणत्याही भारतीय खेळाडूला हे स्थान मिळाले नव्हते. येथून सानिया मिर्झाने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने एकेरी आणि दुहेरीचे सामने जिंकत राहिले. तिने बॅक टू बॅक WTA दुहेरी विजेतेपदं जिंकली आणि ग्रँड स्लॅममध्येही आपला ठसा कायम ठेवला. 2007 मध्ये, ती WTA एकेरी क्रमवारीत 27 व्या स्थानावर होती. सानियाने तिच्या कारकिर्दीत एक एकेरी WTA आणि 43 दुहेरी WTA विजेतेपद पटकावली.

6 दुहेरी ग्रँडस्लॅम खिशात

2009 मध्ये सानियाने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. ती ऑस्ट्रेलियन ओपन 2009 मध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीची चॅम्पियन बनली. यानंतर त्याने फ्रेंच ओपन 2012 आणि यूएस ओपन 2014 मध्ये मिश्र दुहेरीतही विजेतेपद पटकावले. यानंतर तिचे अधिक लक्ष महिला दुहेरीवर गेले. 2015 मध्ये, सानियाने विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली होती. अशाप्रकारे त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 6 दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. सानिया मिर्झाने प्रथमच महिला दुहेरीत प्रथम क्रमांक पटकावला. 13 एप्रिल 2005 रोजीच तिनी हे स्थान मिळवले. ती तब्बल 91 आठवडे टॉपवर राहिली होती.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलVibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget