PM Modi : पंतप्रधानांना गिफ्ट मिळाली मेस्सीची जर्सी, अर्जेंटिनाकडून मोदींसाठी खास भेट, पाहा फोटो
PM Modi : अर्जेंटिना येथील YPF वीज कंपनीचे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेझ यांनी बेंगळुरू येथे इंडिया एनर्जी वीकच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना लिओनेल मेस्सीची जर्सी भेट म्हणून दिली.
PM Modi with Messi Jersey : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी अर्जेंटिनाकडून एक खास भेट आली आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू आणि फिफा विश्वचषक विजेता कर्णधार लिओनेल मेस्सी (Lionel MessI) याची जर्सी थेट अर्जेंटिनाहून पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यात आली आहे. या जर्सीवर लिओनेल मेस्सीसह संपूर्ण संघातील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत. मंगळवारी अर्जेंटिना एनर्जी कंपनीचे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेझ यांनी भारतीय ऊर्जा सप्ताहात पंतप्रधान मोदींना ही जर्सी भेट दिली. बंगळुरू येथे भारतीय ऊर्जा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला आणि लिओनेल मेस्सीच्या संघाने विजेतेपद पटकावलं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना खेळला गेला होता. अर्जेंटिनाच्या या विजयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून लिओनेल मेस्सीच्या संघाचे अभिनंदन केले होते. पीएम मोदींचे ते ट्वीट चांगलेच व्हायरल झाले होते. आता अर्जेंटिना संघानेही मोदींना जर्सी भेट देत धन्यवाद केलं आहे.
काय म्हणाले पीएम मोदी?
फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, फुटबॉलच्या इतिहासातील हा सर्वात रोमांचक सामना होता. फिफा विश्वचषक जिंकल्याबद्दल मी अर्जेंटिना संघाचे अभिनंदन करतो. संपूर्ण स्पर्धेत या संघाने नेत्रदीपक खेळ सादर केला. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे लिहिले की, अर्जेंटिनाच्या या विजयामुळे करोडो भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. पीएम मोदींचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
रोमहर्षक होती फिफा विश्वचषकाची फायनल
फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेंटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला.
हे देखील वाचा-