भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव झाला 'बापमाणूस', गोंडस पोस्ट शेअर करत दिली माहिती
उमेश यादव यांची पत्नी तान्या (Tanya) यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ट्विटरद्वारे उमेश यादव याला त्यांच्या मुलीच्या जन्माच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
![भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव झाला 'बापमाणूस', गोंडस पोस्ट शेअर करत दिली माहिती indian fast bowler Umesh Yadav and his wife Tanya have been blessed with a baby girl BCCI Congratulates भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव झाला 'बापमाणूस', गोंडस पोस्ट शेअर करत दिली माहिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/01233127/Umesh-Yadav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) पिता झाला आहे. उमेश यादव यांची पत्नी तान्या (Tanya) यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. उमेश यादव आणि त्यांची पत्नी तान्या यांच्यासाठी सन 2021 हे वर्ष खूप खास बनले आहे. उमेश यादव यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. चाहते आणि त्याचे सहकारी खेळाडू कमेंटद्वारे या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील उमेश यादव याला ट्विटरच्या माध्यमातून आपल्या मुलीच्या जन्माच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयने ट्विट केले आहे की उमेश यादव यांना मुलीच्या जन्माच्या शुभेच्छा. आम्ही आशा करतो की तो लवकरच मैदानात जाईल. उमेश यादव सध्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर आला आहे.
View this post on Instagram
अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने मोठा बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाबरोबर खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माची भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश यादव आणि मोहम्मद शमीच्या जागी टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांना संघात स्थान देण्यात आल्याची माहिती आहे.
सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) 7 जानेवारी 2021 पासून कसोटी मालिकेचा तिसरा कसोटी सामना सुरू होईल. चौथा आणि अंतिम सामना 15 जानेवारीपासून ब्रिटनमधील गाबा येथे खेळला जाईल. सध्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. तिसर्या कसोटी सामन्याची क्रिकेट चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातमी : IND vs AUS | उमेश यादव आणि मोहम्मद शमीच्या जागी 'या' दोन खेळाडूंना संधी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)