FIFA Nations Cup 2022 : भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी, फिफा नेशन्स कपमध्ये मिळवला पहिला-वहिला विजय
Team India FIFA Nations Cup 2022: भारतीय फुटबॉल संघाने फिफा नेशन्स कप 2022 स्पर्धेसाठी यंदा पहिल्यांदाच पात्रता मिळवल्यानंतर आता पहिला-वहिला विजयही मिळवला आहे.
Indian Football Team FIFA Nations Cup 2022 : भारतामध्ये अलीकडे फुटबॉल खेळाला बरीच प्रसिद्धी मिळाली असून यंदा भारतीय फुटबॉल संघाने फिफा नेशन्स कप 2022 (Fifa Nations Cup 2022) या भव्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवत इतिहास रचला. ज्यानंतर आता पहिल्याच दिवशी झालेल्या पाच सामन्यांमधील एका सामन्या मोरक्को देशाला मात देत पहिला-वहिला विजयी नावे केला आहे. 27 ते 30 जुलै या दिवसांत डेन्मार्क शहराच्या कोपेनहेगनमध्ये खेळवली जाणार आहे. भारताने प्लेऑफमध्ये कोरिया आणि मलेशिया या संघाना मात देत पात्रता मिळवली होती.
कसा होता पहिला दिवस?
पहिल्या दिवशी भारताने ग्रुप डी मध्ये पाच सामने खेळले. यावेळी इटली विरुद्ध भारत सामना अनिर्णीत राहिला. पोलंडने भारताला 3-2 च्या फरकाने मात दिली. नेदरलँडनेही भारताला 1-0 ने पराभूत केलं. मेक्सिकोविरुद्धचा सामना 0-0 ने अनिर्णीत सुटला. तर मोरक्कोविरुद्ध मात्र भारताने 2-1 ने विजय मिळवला. ग्रुप डी मध्ये भारत इटली, नेदरलँड्स, पोलंड, मॅक्सिको आणि मोरक्को या देशांसोबत आहे. यावेळी पहिल्या दिवशी भारातने 5 गुण खात्यात जमा केले.
28 तारखेचं भारताचं वेळापत्रक
सामना | वेळ |
भारत विरुद्ध इटली | रात्री 9.35 |
भारत विरुद्ध नेदरलँड | रात्री 10 |
भारत विरुद्ध पोलंड | रात्री 10.25 |
भारत विरुद्ध मेक्सिको | रात्री 11.10 |
भारत विरुद्ध मोरक्को | रात्री 11.35 |
पहिल्यांदाच भारत पात्र
फिफा नेशन्स कप च्या यंदाच्या सीजनमध्ये भारत आशिया/ओशिनिया क्षेत्रात होता. भारताला प्ले-इन्समध्ये स्थान दिलं गेलं होतं. यावेळी प्लेऑफमध्ये भारताला एन्ट्री मिळाली होती. प्ले-इनच्या दरम्यान भारताने 32 सामने खेळले, ज्यातील 12 सामने जिंकत, 11 मध्ये भारत पराभूत झाला. तर 9 सामने अनिर्णीत ठरले. संपूर्ण 4 साने भारताने डिविजन 1 मध्ये स्थान कायम ठेवलं. ज्यामुळे सत्राच्या अखेरीस भारत वर्ल्ड रँकिंगमध्ये 19 व्या नंबरवर राहिला आणि दिमाखात पात्रता मिळवली. यावेळी भारताने चरणजोत सिंह, सिद्ध चंदराना आणि सारांश जैन यांच्या खेळीच्या मदतीने कोरिया आणि मलेशिया सारख्या संघाना मात देत ही पात्रता मिळवली आहे.
हे देखील वाचा-
- Chess Olympiad 2022 : आजपासून सुरु होणार बुद्धिबळ ऑलिम्पियाड; कुठे पाहाल सामने? कसं आहे वेळापत्रक?
- Commonwealth Games 2022 : भारतीय महिला कॉमनवेल्थ सर करण्यासाठी सज्ज, कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!
- Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, हरमनप्रीत कर्णधार, तर मंधाना उपकर्णधार