एक्स्प्लोर
Advertisement
महिला बॉक्सर मेरी कोमला सहाव्यांदा विश्वविजेतेपद
नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने 48 किलो वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला.
नवी दिल्ली : भारताची महिला बॉक्सर एमसी मेरी कोम सहाव्यांदा विश्वविजेती ठरली आहे. नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला.
मेरी कोमचे जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतले हे सहावे सुवर्णपदक असून, आजवरच्या इतिहासातली ती सर्वात यशस्वी बॉक्सर ठरली आहे. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोटाचा 5-0 असा पराभव केला.
फायनलमध्ये मेरीचा आक्रमक अवतार पहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्या फेरीपासून तिने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या फेरीत तिने ओखोटाला हतबल केले होते. पहिल्या फेरीतल्या आक्रमणामुळे तिला आघाडी मिळाली. त्यामुळे सामन्याच्या शेवटपर्यंत ओखोटा दबावात होती. याचाच फायदा मेरीने घेतला.
मेरी कोमने याआधी 2002, 2005, 2006, 2008 आणि 2010 सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2001 सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम कांस्यपदकाची मानकरी ठरली होती.
And 🇮🇳’s golden lady has done it; @MangteC is the current reigning light fly champion after she defeats Ukraine’s H.Okhota in an unanimous 5:0 decision at the #WWCHs2018 grand finale! Congratulations Mary! #PunchMeinHainDum #AIBA pic.twitter.com/EcILbkgCLO
— Boxing Federation (@BFI_official) November 24, 2018
???????? CHAMPION #MaryKom!! Women's #WorldBoxingChampionships : @MangteC wins GOLD in 48 kg to clinch a record sixth world title by defeating Ukraine's Hanna Okhota 5:0. CONGRATULATIONS!! pic.twitter.com/e10sHCmTh3
— Doordarshan National (@DDNational) November 24, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement