CWG 2022 : टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताला रौप्य, फायनलमध्ये पराभवामुळे सुवर्णपदक हुकलं
CWG 2022 : भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ स्पर्धेत कमाल कामगिरी करत असून नुकतंच टेबल टेनिसमध्ये मिळवलेल्या रौप्य पदकामुळे भारताची पदकसंख्या 49 झाली आहे.
Table Tennis Men's Doubles : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतानं 49 वं पदक मिळवलं आहे. टेबल टेनिसमध्ये भारताचा पुरुष दुहेरी संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्यमुळे भारताला गोल्ड मिळालं नसलं तरी रौप्यपदक मिळालं आहे. अचंता शरथ कमल आणि साथियान गनसेकरन या जोडीला फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला आहे.
अंतिम सामन्यात अचंता आणि साथियान यांनी चांगली झुंज दिली पण इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल आणि लियाम पीचफोर्ड यांनी अधिक दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. 11-8, 8-11, 3-11, 11-7 आणि 4-11 अशा फरकाने हा सामना त्यांनी जिंकला. पण रौप्यपदक कमाईमुळे भारताची पदकसंख्या 49 झाली आहे.
SPECTACULAR SILVER 🥈@sharathkamal1 /@sathiyantt put up a spectacular performance in the Gold Medal MD bout and clinch SILVER 🥈 following a 2-3 result against 🏴's Drinkhall / Pitchford
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2022
2️⃣nd medal for 🇮🇳 in #TableTennis so far this #CommonwealthGames2022 💪💪#Cheer4India pic.twitter.com/aZtVMMLfXm
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदक जिकणाऱ्या खेळाडूंची यादी
सुवर्णपदक-16: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी) ), नीतू घणघस, अमित पंघल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन.
रौप्यपदक-13: संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, टेबल टेनिस पुरुष दुहेरी.
कांस्यपदक- 19: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी.
हे देखील वाचा-