India Women vs Pakistan Women 2025: पाकिस्तानी विरोधाची धग महिला टीम इंडियामध्येही पोहोचली! आता हरमनप्रीत कौरने घेतलेल्या निर्णयाची चर्चा
"महिला क्रिकेट विश्वचषक 2025: भारत vs पाकिस्तान सामना आज कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर. हरमनप्रीत कौर नेतृत्वाखालील भारतीय संघाचा सामना, नाणेफेक निर्णय, आणि सामन्याचे ताजे अपडेट्स येथे वाचा."

India Women vs Pakistan Women 2025: भारतीय महिला संघाचा (Indian women cricket team news) महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मधील दुसरा सामना आज (5 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध होत आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार फातिमा साना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तान विरोधाची धग दिसून आली. नाणेफेक दरम्यान पुन्हा एकदा हस्तांदोलन न करण्याचे धोरण पाळण्यात आले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानी कर्णधार फातिमा सानाशी हस्तांदोलन केले नाही. यापूर्वी, भारतीय पुरुष संघाने आशिया कप 2025 मध्ये असे केले होते. त्यावेळी, भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही.
It's time for some batting firepower 💥
— Star Sports (@StarSportsIndia) October 5, 2025
Pakistan win the toss and #TeamIndia will bat first! 🏏
Catch the LIVE action ➡ https://t.co/CdmEhf3jle#CWC25 👉 #INDvPAK | LIVE NOW on Star Sports network & JioHotstar! pic.twitter.com/bqYyKrwFLt
हस्तांदोलन करण्याचे निर्देश दिले नव्हते (BCCI India Pakistan cricket policy)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की बोर्डाने खेळाडूंना पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्याचे निर्देश दिले नव्हते. ते म्हणाले, "धोरणात कोणताही बदल झालेला नाही. खेळाडूंना हस्तांदोलन करण्याचे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. आमचे लक्ष केवळ खेळावर आहे."
मोहसिन नक्वीकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारली नाही (India Pakistan cricket rivalry 2025)
हा मुद्दा पहिल्यांदा पुरुषांच्या आशिया कप दरम्यान उद्भवला, जेव्हा भारत आणि पाकिस्तान तीन वेळा एकमेकांसमोर आले. त्यावेळी भारतीय संघाने सामन्यांपूर्वी आणि नंतर हस्तांदोलन टाळले. पाकिस्तानी प्रशिक्षक माइक हेसन यांनी दावा केला की सुरक्षा आणि राजकीय संवेदनशीलतेमुळे भारतीय संघाने असे केले. भारतीय संघाने मोहसिन नक्वीकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने तणाव आणखी वाढला. भारत सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की पाकिस्तानशी क्रीडा संबंध आयसीसी स्पर्धा किंवा तटस्थ ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांपुरते मर्यादित राहतील. दोन्ही देशांमधील शेवटची द्विपक्षीय क्रिकेट मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. महिला विश्वचषकासाठी, पाकिस्तानी संघ कोलंबोमध्ये आहे, तर भारताचे सामने गुवाहाटी आणि कोलंबोमध्ये खेळले जात आहेत. भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 59 धावांनी पराभव करून दमदार सुरुवात केली.
इतर महत्वाच्या बातम्या


















