एक्स्प्लोर
वानखेडेवर तिरंगा, इंग्लंडवर 1 डाव 36 धावांनी मात
मुंबई: मुंबई कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला असून मालिकाही खिशात घातली आहे. चौथ्या कसोटीत भारतानं इंग्लंडला 1 डाव आणि 36 धावांनी पराभूत केलं आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात आर. अश्विननं इंग्लंडच्या 12 फलंदाजांना माघारी धाडण्याचा पराक्रम गाजवला. तर कर्णधार विराट कोहलीनं द्विशतक ठोकलं. 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-0नं आघाडी घेतली आहे.
डावानं पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला 231 धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 195 धावांतच आटोपला. अश्विनने दुसऱ्या डावातही इंग्लंडचे 6 गडी बाद केले.
दरम्यान, अश्विननं एका डावात 5 बळी घेण्याचा कपिल देवचा विक्रमही मोडीत काढला आहे. कपिल देवनं 23 वेळा एका डावात 5 बळी घेतले होते. तर अश्विननं आता 24 वेळा अशी कामगिरी केली आहे.
इंग्लंडने आज 6 बाद 182 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. मात्र सकाळच्या सत्रापासूनच भारतीय गोलंदाजांनी आक्रमणाला सुरुवात केली. इंग्लंडच्या एक-एक फलंदाजाला तंबूत धाडून, भारताचा विजय साकार केला.
भारताचा 631 धावांचा डोंगर
त्याआधी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 631 धावांची मजल मारून इंग्लंडवर 231 धावांची आघाडी घेतली होती.
कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक आणि जयंत यादवच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला ही मजल मारता आली.
विराट कोहलीनं आज आपल्या कसोटी कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक साजरं केलं. विराटच्या दमदार खेळीमुळं भारताने चौथ्या कसोटीत 231 धावांची आघाडी मिळवली.
विराट कोहलीने 340 चेंडूंमध्ये 25 चौकार आणि एका षटकारासह 235 धावा फटकावल्या. विराटचं हे गेल्या पाच महिन्यांमधलं तिसरं द्विशतक आहे. विशेष म्हणजे सलग तीन कसोटी मालिकांमध्ये विराटनं द्विशतकं ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे.
जयंत यादवचं शतक
विराटनं जयंत यादवच्या साथीनं आठव्या विकेटसाठी 241 धावांची मजबूत भागीदारीही रचली.
जयंतनं नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 204 चेंडूंमध्ये 15 चौकारांसह 104 धावांची खेळी केली. भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 631 धावांची मजल मारली होती आणि इंग्लंडवर 231 धावांची आघाडी घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement