Thomas Cup 2022: थॉमस कपमध्ये भारताला आणखी एक यश, पुरुष दुहेरीत 2-0 ने विजय
Thomas Cup 2022 : भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ इंडोनेशियाविरुद्ध थॉमस कपचा अंतिम सामना खेळत असून दुसऱ्या पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने विजय मिळवला आहे.
Thomas Cup 2022 : भारतीय बॅडमिंटन संघ बँकॉकमध्ये इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. प्रसिद्ध अशा थॉमस कप (Thomas Cup) स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकल्यानंतर आता दुसऱ्या पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने विजय मिळवला आहे. या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली आहे. दरम्यान या स्पर्धेतील पाच सामन्यांपैकी जो संघ आधी तीन सामने जिंकले त्याला चॅम्पियन घोषित केलं जाणार आहे. दरम्यान भारताने आतापर्यंत दोन सलग सामने जिंकत आघाडी घेतली आहे.
लक्ष्य सेननं रचला पाया
या महत्त्वाच्या स्पर्धेत सर्वात आधी भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं अंतिम फेरीत इंडोनेशियन खेळाडू अँथॉनी गिंटिंगचा (Anthony Ginting) पराभव करत दमदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात इंडोनेशियन खेळाडू अँथनी सिनिसुका गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. या सामन्यात लक्ष्यने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर एक तास पाच मिनिटांत विजय मिळवला. या विजयासह भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताकडे इतिहास रचण्याची संधी
74 वर्षांनंतर प्रथमच थॉमस कपमध्ये अंतिम सामना खेळणं ही भारतासाठी फोर मोठी गोष्ट आहे. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवत आधीच इतिहास रचला होता. मात्र, या इतिहासाचं शेवटचं पान लिहिणं अजून बाकी आहे. लक्ष्य सेनने थॉमस कपमधील सर्वात यशस्वी संघाविरुद्ध भारताला आवश्यक ती सुरुवात करून दिली आहे. सामना जिंकण्यासाठी प्रथम जोरदार आक्रमण करणं अत्यंत आवश्यक असते. भारतीय संघासाठी काम लक्ष्य सेननं चोख पार पाडलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Lakshya Sen Wins : थॉमस कपमध्ये भारत इतिहास रचण्याच्या तयारीत, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनकडून इंडोनेशियन खेळाडूचा पराभव
- Andrew Symonds Death : ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
- Top 10 Key Points : कोलकात्याचा हैदराबादवर मोठा विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर