India vs South Africa: टीम इंडियाची तब्बल 45 जणांची फौज दक्षिण आफ्रिकेला जाणार, पण चाहत्यांचा जीव दोन नावात अडकला! अजूनही सस्पेन्स कायम
India vs South Africa : रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग नाही. असे असले तरी त्याच्याकडून कोणताही निरोप मिळालेला नाही. दुसरीकडे, विराटने बीसीसीआयला विनंती करत ब्रेक देण्यास सांगितले आहे.
India vs South Africa: टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध T-20 मालिका खेळत आहे. यानंतर येत्या डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आज (30 नोव्हेंबर) या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 45 खेळाडूंची निवड करणार आहे.
BCCI has applied the visas for 45 players for the South Africa tour. [Indian Express]
— Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2023
- India A, ODI, T20I & Tests in the tour. pic.twitter.com/TdEbXB4fET
चर्चा फक्त रोहित आणि विराटची!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने 45 खेळाडूंच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. येथे दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळवले जातील. 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रोहित शर्माचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग नाही. असे असले तरी त्याच्याकडून कोणताही निरोप मिळालेला नाही. दुसरीकडे, विराटने बीसीसीआयला विनंती करत ब्रेक देण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्याची निवड होणार की नाही? याचीही चर्चा सुरुच आहे.
The BCCI and selectors will have a discussion with Rohit Sharma over his future in T20is. They'll be happy to see him for the 2024 World Cup. (TOI). pic.twitter.com/mgBNGWtooj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 30, 2023
त्यामुळे विराट कोहली विश्रांती घेऊ शकतो. कोहलीने वनडे आणि टी-20 मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतच स्थान देऊ शकते. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल कसोटीत पुनरागमन करू शकतात. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत राहुल आणि अय्यर देखील भारतीय संघाचा भाग होते. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ केएल राहुलला टी-20 संघाचा कर्णधार बनवू शकतो.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T-20 सामना 10 डिसेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 12 डिसेंबरला खेळवला जाईल. तिसरा T- 20 14 डिसेंबरला होणार आहे. 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर दुसरा सामना 19 डिसेंबरला तर तिसरा सामना 21 डिसेंबरला होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून तर दुसरा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या