India vs Pakistan : गजब बेज्जती है यार! कायम रडीचा डाव खेळणाऱ्या शोएब अख्तरची वासिम जाफरनं पाच शब्दात लाज काढली!
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शिवाय नेहमीच रडीचा डाव खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला शोएब अख्तरने ट्विट करून खोड केल्यानंतर मुंबईकर वासिम जाफरने त्याचा चांगला समाचार घेतला आहे.
अहमदाबाद : वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला आज जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघातील रण हे जितकं मैदानावर असते तितकच मैदानाबाहेरही असतं. माजी क्रिकेटर चाहत्यांपासून ते पार दोन्ही देशातील छोट्या मोठ्या शहरांपर्यंत हे द्वंद नेहमीच चाललेलं असतं. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता फक्त दोन देशांमध्ये, तर संपूर्ण जगाला असते. वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा भारत पाकिस्तान आमने-सामने येत आहेत.
शोएब अख्तरला खोचक टोला
मैदानाबाहेर सुद्धा आता सोशल मीडियामध्ये माजी खेळाडूंमध्येही सामना रंगला आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शिवाय नेहमीच रडीचा डाव खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला शोएब अख्तरने ट्विट करून खोड केल्यानंतर मुंबईकर वासिम जाफरने त्याचा चांगला समाचार घेतला आहे. वासिम जाफरने त्याची चांगलीच खेचली आहे आणि एक मीम शेअर करत टोला लगावला आहे.
WC mein Test wali photo 😏😅 #INDvPAK #CWC2023 https://t.co/1E6ZlAhzd9 pic.twitter.com/fFz5TB2YgF
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) October 14, 2023
शोएबने ट्विट करत "ऐसा कुछ करना है तो थंड रखे" असा हॅशटॅग देत व आपला स्वतःचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत बाजूला सचिन मैदानात परत जात असतानाचा आहे. मात्र, हा फोटो कसोटी सामन्यातील आहे. नेमका हाच मुद्दा पकडत वासिम जाफरने त्याची जोरदार खेचली आहे.
Kal agar asa kuch kerna hai, toh #ThandRakh pic.twitter.com/gJg8f9OQf6
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 13, 2023
"वर्ल्डकप में टेस्ट वाली फोटो" म्हणत हसण्याचे दोन इमोजी शेअर केले आहेत. त्याचबरोबर एक मीम शेअर करत टोला लागावाला आहे. त्यामध्ये म्हटल आहे "चाहे तू कुछ ना कहो मैने सून लिया" त्यामुळे सामना सुरु होण्यापासू ते संपेपर्यंत आणि संपल्यानंतरही सुरूच राहील यात काही शंका नाही.
दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील तेव्हा रोहित सेना हा विक्रम 8-0 ने करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल यात शंका नाही. विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रोहित शर्मा यांसारख्या नायकांनी भरलेल्या संघाकडून चाहत्यांना कोणत्याही किंमतीत विजय हवा आहे. दुसरीकडे, अलीकडेच आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून एकतर्फी पराभव झाला. पाकिस्तानने अलीकडेच एका उच्च धावसंख्येच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता, तर रोहित शर्माचा संघ अफगाणिस्तानला एकतर्फी सामन्यात पराभूत करून अहमदाबादला पोहोचला आहे. एक लाखाहून अधिक चाहते स्टेडियममध्ये असतील आणि सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर असतील.
इतर महत्वाच्या बातम्या