एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

India vs Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टाॅस किती महत्त्वाचा? चालू वर्ल्डकपच्या 11 सामन्यातील इतिहास भलतंच काही सांगतोय!

विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. या सात सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.1992 मध्ये या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला होता.

अहमदाबाद : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा इतिहास मोठा आणि गौरवशाली आहे. दोन्ही संघाच्या क्रिकेटच्या इतिहासातील काही सर्वात रोमांचक सामने झाले आहेत. मात्र, विश्वचषकातील सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. या सात सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.1992 मध्ये या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला होता. त्यावेळी पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता, पण भारतीय संघापुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्येही हा विक्रम अबाधित राहिला. सातही सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला.

वाचा : India Vs Pakistan World cup 2023 : पाकिस्तानची भले मागील सामन्यात रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी पण हे 5 विक्रम स्वप्नातही मोडू शकत नाही!

भारताने पाकिस्तानचा किती फरकाने पराभव केला?

  • 2019 भारत 89 धावांनी जिंकला (DLS पद्धत)
  • 2015 भारत 76 धावांनी जिंकला
  • 2011 भारत 29 धावांनी जिंकला
  • 2003 भारत 6 गडी राखून जिंकला
  • 1999 भारत 47 धावांनी जिंकला
  • 1996 भारत 39 धावांनी जिंकला
  • 1992 भारत 43 धावांनी जिंकला

नाणेफेक किती महत्वाची?

दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक गमावली तर ते टीम इंडियासाठी लकी ठरू शकते. चालू वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ आठ वेळा पराभूत झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये रोहित शर्माला नाणेफेक जिंकता आली नसली, तरी भारतीय संघ हे दोन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन किंवा शार्दुल ठाकूर यांना खेळवायचे की नाही या एकमेव प्रश्नाचे उत्तर भारताला आता हवे आहे कारण दोघेही आठव्या क्रमांकावर खेळण्याचे दावेदार आहेत. जर खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य असेल तर शार्दुल हा एक चांगला पर्याय आहे, पण जर चेंडू थोडासा संथ गतीने येत असल्यास लांब चौकारांमुळे अश्विन प्रभावी पर्याय असेल.

वाचा : Suryakumar Yadav : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वीच सूर्या वैतागला अन् थेट सल्ला देऊन टाकला! नेमका प्रकार काय घडला?

अलीकडेच आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून एकतर्फी पराभव

भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील तेव्हा रोहित सेना हा विक्रम 8-0 ने करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल यात शंका नाही. विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रोहित शर्मा यांसारख्या नायकांनी भरलेल्या संघाकडून चाहत्यांना कोणत्याही किंमतीत विजय हवा आहे. दुसरीकडे, अलीकडेच आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून एकतर्फी पराभव झाला. पाकिस्तानने अलीकडेच एका उच्च धावसंख्येच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता, तर रोहित शर्माचा संघ अफगाणिस्तानला एकतर्फी सामन्यात पराभूत करून अहमदाबादला पोहोचला आहे. एक लाखाहून अधिक चाहते स्टेडियममध्ये असतील आणि सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर असतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम फेर मतमोजणीची मागणीABP Majha Headlines :  12 PM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Conflict: सत्तास्थापनेचा महातिढा; महाराष्ट्रातील रखडलेले प्रश्नChandrashekhar Bawankule : निकालावर प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे जनतेचा अपमान - बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Embed widget