Ind vs Pak, Asia Cup Hockey : भारत-पाकिस्तान आमने-सामने, आशिया कपमध्ये रंगणार लढत
IND vs PAK Asia Cup Hockey 2022 Live Streaming : हॉकी स्पर्धेचा आशिया कपमध्ये आज भारतीय संघाची लढत पाकिस्तानशी होणार आहे.
![Ind vs Pak, Asia Cup Hockey : भारत-पाकिस्तान आमने-सामने, आशिया कपमध्ये रंगणार लढत India vs Pakistan Asia Cup Hockey 2022 Get to know when and where to watch, team squad and other details Ind vs Pak, Asia Cup Hockey : भारत-पाकिस्तान आमने-सामने, आशिया कपमध्ये रंगणार लढत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/d4a407bc54d723198f38938ab874bd30_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Pakistan Asia Cup Hockey 2022 : क्रिकेटच्या मैदानातील कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत-पाकिस्तान आज हॉकीच्या मैदानात एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. हॉकी खेळाच्या आशिया कप स्पर्धेत आज गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या टूर्नामेंटमध्ये भारताचं कर्णधारपद अनुभवी हॉकीपटू बीरेंद्र लाकरा (Birendra Lakra) याच्याकडे असेल. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ स्पर्धेच्या पूल ए मध्ये आहेत.
पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ आहेत. कट्टर प्रतिस्पर्धक भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही प्रत्येकी तीन-तीन वेळा ही टूर्नामेंट जिंकली आहे. पाकिस्तानने स्पर्धेच्या सुरुवातीची काही वर्षे म्हणजे 1982, 1985, 1989 साली विजय मिळवला होता. तर भारताने 2003, 2007 नंतर याआधी झालेल्या 2017 च्या हंगामातही विजय मिळवला होता.
पूल ए : भारत, पाकिस्तान, जपान आणि इंडोनेशिया
पूल बी: मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश
कधी आहे सामना?
आज 23 मे रोजी भारत आणि पाकिस्तान हॉकी संघामध्ये हा सामना पार पडत आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या गेलोरा, बुंग कार्नो स्टेडियम कॉम्पलेक्समध्ये खेळवला जात आहे.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजची हॉकी मॅच 5 वाजता सुरु झाली आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)