India vs New Zealand : हुकमी फिरकी अस्त्रावर तुटून पडले, पण टीम इंडियाची वेगवान 'त्रिमूर्ती' न्यूझीलंडच्या छाताडावर नाचली!
शेवटची 15 षटके शमी, सिराज आणि बुमराहच्या गोलंदाजीने निर्णायक ठरली. या त्रिमूर्तीने केलेल्या भेदक माऱ्याने न्यूझीलंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला. भारताने शेवटच्या 10 षटकांत केवळ 54 धावा दिल्या.
धरमशाला : विजयाचा चौकार मारल्यानंतर अत्यंत आव्हानात्मक आणि गेल्या 20 वर्षांपासून आयसीसी स्पर्धेत बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची लढत होत आहे. या लढतीत न्यूझीलंडने टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळवले होते. स्पर्धेत नव्हे, तर हुकमी अस्त्र असलेल्या फिरकीवर आज न्यूझीलंडकडून कडाडून प्रहार करण्यात आला. मात्र, टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीतील त्रिमूर्ती असलेल्या मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि याॅर्कर किंग जसप्रित बुमराहने केलेल्या घातक गोलंदाजीने न्यूझीलंडला 2 बाद 178 वरून 50 षटकात सर्वबाद 273 धावांवर रोखले.
48 YEARS OF WORLD CUP HISTORY:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
After 12 innings in the World Cup - no one had more wickets, more fifers, better average and lower Strike Rate than Mohammed Shami. pic.twitter.com/3Y0hWlpTxd
कुलदीपने या सामन्यात दोन बळी घेतले, पण त्याला आज 73 धावांचे मोल द्यावे लागले, तर जडेजाने 48 धावा दिल्या, पण विकेट मिळाली नाही. गेल्या चार सामन्यात जडेजा आणि कुलदीप यादवने विरोधी संघाना आपल्या तालावर नाचवलं आहे. त्यामुळे आज न्यूझीलंडने दोन्ही फिरकीपटूंवर कडाडून प्रहार केल्याने टीम इंडियात सन्नाटा पसरला होता. मात्र, शेवटची 15 षटके शमी, सिराज आणि बुमराहच्या गोलंदाजीने निर्णायक ठरली. या त्रिमूर्तीने केलेल्या भेदक माऱ्याने न्यूझीलंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला. भारताने शेवटच्या 10 षटकांत केवळ 54 धावा देताना सहा विकेट घेतल्या.
India are blessed to have such a pace trio. pic.twitter.com/UflXGLdrYB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
वेगवान 'त्रिमूर्ती' छाताडावर नाचली!
तत्पूर्वी, नेहमीप्रमाणे सिराजने निराश न करता भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने चौथ्याच षटकात काॅनवेला बाद केले. त्यानंतर स्पर्धेत पहिलाच सामना खेळत असलेल्या शमीने नवव्या षटकात पहिल्याच चेंडूवर विल यंगची दांडी गुल केली. त्याने दुसऱ्या षटकातही रचिन रविंद्रला सोपा झेल देण्यास भाग पाडले होते, पण कधी नव्हे तो जडेजाच्या हातून कॅच सुटला. त्याला एकाच ओव्हरमध्ये दोन जीवदान मिळाली. त्यानंतर मिशेल आणि रविंद्रने 159 धावांची भागीदारी केली.
Most four wickets haul in the World Cup history (innings):
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
Mitchell Starc - 6 (22).
Mohammed Shami - 5 (12).
- A GOAT of World Cups...!!! pic.twitter.com/LIz5s2Jcod
यानंतर पुन्हा शमी मदतीसाठी धावून आला. त्याने 75 धावांवर रविंद्रला बाद केले. त्यानंतर कुलदीपनेही पुनरागमन करताना दोन विकेट घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर टाकले आणि टीम इंडियाची सुद्धा सामन्यात वापसी झाली. शमी, सिराज आणि बुमराहने या सामन्यात 7 विकेट घेतल्या. शमी आणि सिराजने नियंत्रित मारा करताना एक एक विकेट घेतली.
शमीचा भेदक मारा
मोहम्मद शमीने नवीन चेंडू मिळाला नसतानाही त्याने पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विल यंगची विकेट घेतली. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने रचिन रवींद्रला 75 धावा काढून बाद केले. त्याने 54 धावांत पाच विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला रोखले. विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा सर्वाधिक 5 बळी घेणारा शमी भारताचा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, माजी भारतीय दिग्गज कपिल देव, व्यंकटेश प्रसाद रॉबिन सिंग, आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांच्यासह वर्ल्ड कपमध्ये एकदा 5 बळी घेणार्या गोलंदाजांमध्ये तो होता. पण आता या स्पर्धेत दोनदा 5 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
HISTORIC.
— Johns. (@CricCrazyJohns) October 22, 2023
Shami is the first Indian to take 2 five-wicket haul in 48 year old World Cup history. pic.twitter.com/sJqHq3jG7s
शमीने 2019 स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पहिले 5 बळी घेतले होते. त्यानंतर त्याने 54 धावा केल्या आणि 5 बळी घेतले. आज न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजाने 69 धावांत 5 बळी घेतले. आज शमीने विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांना आपला बळी बनवले.
असे आहेत शमीचे विश्वचषकातील आकडे
- सामने - 12
- विकेट - 36
- सरासरी- 15.02
- स्ट्राईक रेट- 17.6
- अर्थव्यवस्था- 5.09
विश्वचषकात सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज
- 2 वेळा- मोहम्मद शमी
- 1 वेळ- कपिल देव
- 1 वेळ- व्यंकटेश प्रसाद
- 1 वेळ- रॉबिन सिंग
- 1 वेळ- आशिष नेहरा
- 1 वेळ- युवराज सिंग
इतर महत्वाच्या बातम्या